काहीतरी कारण काढुन तुझी ओळख करुन घेणं...
ओळख झाल्यावर तुझ्या घरासमोरुन..सतराशे साठ चकरा मारणं...
तुझ्या घरी यायला मिळावे म्हणुन...
तुझ्या "बोअर"..भावाची "भंकस" ऐकुन घेणं..
तुझ्या बरोबर रहाण्यासाठी....
तुझ्या बहीणीचे" फालतु " नखरे" सहन करणं!!!
तुझे लक्ष नसताना.तास न तास तुझ्याकडे पहात रहाणं..
तुझे "मधाळ" बोलणं..
बोलताना मानेला हळुच..झटका देणं..
आणी माझ्याकडे ..तिरप्या नजरेनं.पहाणं..
या सार्या" घायाळ.'..करणार्या तुझ्या अदा गुपचुप सहन करणं..!!
हे सारं..सारं... मी का करतोय.....
कधी कळेल का ग याचं कारण तुला ..???
वृषाली