रामचंद्रा तुझा वियोग । ऐसा नको रे प्रसंग।
तुजकारणॆ सर्व संग । त्यक्त केला ॥
–– रामाचा दास स. रामदास––
समर्थांनी आपल्या ब्रह्मचर्याश्रमात लिहिलेले हे काव्य आहे.
काव्य कसले, त्यांच्या जिवीचे आर्तच आहे! डोळ्यात टचकन पाणी यावे इतकी तरलता या दोन ओळींमध्ये समर्थांनी ओतली आहे!
. कल्पना करा! एक १२ वर्षाचे मूल आई ,वडील, भावंडे, मित्र, नातेवाईक सर्वांना सोडून घराबाहेर पडले आहे! एकटेच! सोबत अन्य कुणी नाही!
. खेळायला कुणी नाही, जेवण करून प्रेमाने वाढायला कुणी नाही, पायात काटा घुसला तर काढायला कुणी नाही, ताप आला तर सेवा करायला कुणी नाही, रात्री थंडी पडली तर अंगावर प्रेमाने पांघरूण घालायला कुणी नाही, कौतुक करायला कुणी नाही, प्रेमाने कुशीत घेऊन मायेची ऊब देणारे कुणी नाही...
अशा परिस्थितीत समर्थांना आधार होता तो फ़क्त एका रामाचा! म्हणून अगदी कळवळून ते रामाला प्रार्थना करत आहेत! अरे रामा! तू तरी माझ्या आयुष्यातून जाऊ नकोस रे! तुच जर गेलास ना, तर मला कुणीच नाही रे! फ़क्त तुच एक माझ्या जिवीचा विसावा आहेस! तुझ्यासाठी मी या सर्वाचा त्याग करून आलेलो आहे रे! तुच गेलास तर मी कुणाकडे पाहू? नकोच! असा प्रसंगच तू माझ्यावर आणू नकोस!
*मी तुझा दास आहे, मला सांभाळ रे रामा!*
🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺