Marathi Quote in Poem by Geeta Gajanan Garud

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

बालपणाचा सुंदर सोहळा
खट्याळ,अल्लड बाळबोबडा

सचैल शंभो त्यास आवडे
गोडगोजिरे हास्य चहुकडे

याहुनी सुंदर क्षण कोणता
याहूनी निर्मळ भाव कोणता

देवाघरचे फुल चिमुकले
गंधीत झाले तनमन अवघे

पाण्याचा पडता ओघळ
शहारलं ग कोवळं शैशव

मिटून घेतो डोळे पिटुकले
ओठ आतुर जलास स्पर्शे

मायेचा तो हात डोईवरी
आशिष देतसे क्षणोक्षणी

दोघांचे हे अतुट नाते
चिरंतन असे जन्मांतरीचे

हळूहळू बाळा होशील मोठा
त्रैलोकी मिरवशील झेंडा

उपकार जननीचे नको विसरु
कर्तव्य त्यास कधी नको म्हणू

---गीता गजानन गरुड.

Marathi Poem by Geeta Gajanan Garud : 111884380
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now