Marathi Quote in Blog by vinayak nirpane

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

आवडेल मला पाऊस व्हायला 
जीवनाच्या गच्च काळ्या ढगातून बाहेर यायला 
धारणी मातेच्या मिठीत  सामावून 
तिला चिंब भिजवायला 
आवडेल मला पाऊस व्हायला 

आवडेल मला पाऊस व्हायला 
तहानलेल्याची तहान भागवायला 
बळीराजाचा सोबती बनून 
आवडेल मला जगाचा पोशिंदा बनायला 
आवडेल मला पाऊस व्हायला 

आवडेल मला पाऊस व्हायला 
बंधनाचे पाश तोडून 
तुझ्यासोबत एक क्षण जगायला 
पाण्याचा थेंब बनून 
तुझ्या गालावरून घरंगळायला 
आवडेल मला पाऊस व्हायला 

आवडेल मला पाऊस व्हयला 
तुझ्या अश्रूंसोबत मिळून 
तुझे दुःख समजून घ्यायला 
तुझ्या जीवनाचा सोबती बनायला 
आवडेल मला पाऊस  व्हायला 

या माझ्या साऱ्या आवडीत 
सांग जमेल का तुला साथ द्यायला 
तरच आवडेल मला पाऊस व्हायला 
तरच आवडेल मला  पाऊस व्हायला 

Marathi Blog by vinayak nirpane : 111049305
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now