🩸आजचा रंग लाल.
🩸लाल गाजराचा हलवा
🩸दिल्ली साईड कडून येणाऱ्या या गाजराचा रंग लालभडक असतो
आणि चवीला खुप गोड असतात ही गाजरे
🩸साहित्य
अर्धा किलो गाजरे
दोन वाट्या मिल्क पावडर
दोन मोठे चमचे तूप
दोन वाट्या दुध
साखर अर्धी वाटी
ड्राय फ्रुट ऐच्छिक
काजु बदाम काळे मनुके वगैरे आवडीनुसार
🩸कृती
प्रथम मोठ्या किसणीने गाजरे किसून घ्यावीत
पॅन मधे तूप घालुन कीस टाकावा
मंद आचेवर हलक्या हाताने हलवत रहावे
नावातच "हलवा "असल्यानं मंद आचेवर जितके हलवाल तितका रंग चांगला येईल😊
🩸एकीकडे मिल्क पावडर थोड्या दूधात मिसळून घ्यावी
🩸हा कीस शिजताना झाकण अजिबात ठेवायचे नाही
म्हणजेच रंग चांगला येईल
पाच दहा मिनिटात कीस मऊ होऊ लागेल
🩸आता यात एक वाटी दूध टाकून हलवत ते दुध गाजरात मुरू द्यावें
परत एक कप दूध घालून अशीच कृती करावी
🩸यानंतर अर्धा वाटी साखर घालावी
ही गाजरे मुळात गोड असल्यानं फार साखरेची गरज नसते
साखर घातल्यावर थोडे पाणी सुटेल
थोडा वेळ हलवून
दुधात मिक्स केलेले मिल्क पावडरचे मिश्रण घालावे
🩸यानंतर आपल्या आवडीचे ड्राय फ्रुट घालून एकसारखे करून घ्यावे
मिश्रण हळूहळू घट्ट होईल
🩸पाचच मिनिटात हलवा तयार होईल
सजावट करून खायला घ्यावा
टीप...संपुर्ण कृतीत कधीही पॅन वर झाकणं ठेवू नये😊😊