☀️कुरडई ची भाजी
उन्हाळ्यात एक किलोच्या कुरडया घरी गव्हाचा चिक तयार करून केल्या होत्या
पांढऱ्या शुभ्र, नाजुक आणि चवदार झाल्या होत्या
नमुना म्हणुन मित्र मैत्रिणी शेजारी नातेवाईक यांना भरपुर वाटुन झाल्या
प्रत्येक सणाला तळून झाल्या
खुप चवदार झाल्या होत्या
जेव्हा डबा तळाशी आला तेव्हा लक्षात आले
कुरडई ची भाजी मात्र राहून गेली 😊😊
लगेच उरलेल्या कुरडई ची भाजी केली
☀️दोन तीन कुरडया घेऊन
भरपुर पाण्यात भिजत घातल्या
छान फुगल्या होत्या
दोन तास भिजल्यावर त्या हलक्या हाताने सोडवून घेतल्या
थोडे तुकडे केले
व त्यातील सर्व पाणी काढून टाकले
व त्या थोड्या पिळून घेतल्या
☀️मोहरी हिंग फोडणी करून
कढीलिंब मिरची व कांदा पारतून घेतला
एक छोटा टोमॅटो चिरुन टाकला
त्यावर या पिळून घेतलेल्या कुरडई टाकल्या
☀️थोडे परतुन किंचित हळद व मीठ घातले
झाकण ठेवून पाच सात मिनीटे वाफ दिली
लुसलुशीत भाजी तयार होती
वर थोडे कोथींबीर खोबरे पेरले..
ही भाजी नुसती खा नाहीतर पोळी अथवा ब्रेड सोबत खा.. मस्त लागते