🍈लाल भोपळा नाचणी हलवा
🍈लाल भोपळा रंगीत असल्याने अँटी oxident चे काम तर करतोच
शिवाय लाल भोपळ्याचे सेवन केल्याने तुमची दृष्टी सुधारते आणि डोळ्यांशी संबंधित आजार होण्याची शक्यता कमी होते.
🍈लाल भोपळ्याचे सेवन कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून बचाव करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. व्हिटॅमिन ए समृद्ध भोपळा खाल्ल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो.
🍈नाचणी सुध्दा कॅल्शियम चा उत्तम स्रोत आहे
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, नाचणी खाल्ल्याने पचनक्रिया व्यवस्थित होते. यामधील फायबर अन्नाचे पचन करण्यासाठी मदत करते.
यामुळे पोट पटकन भरते.
पचनक्रिया व्यवस्थित झाल्याने शरीरामध्ये अतिरिक्त चरबी जमा होत नाही आणि वजन वाढण्याचा धोका संभवत नाही.
असे संशोधन सांगते
🍈मी नाचणी तर नेहेमी शक्य असेल तिथं उपयोगी आणते
नाचणी..
शिरा.. थालिपीठ.. भाकरी.. धिरडी.. आप्पे.. इडली वगैरे
🍈ही पाककृती या दोघांचे एक वेगळे कॉम्बो आहे
चविष्ट आणि पौष्टिक 😊
🍈साहित्य
दोन वाट्या लाल भोपळा कीस
दोन चमचे तुप
एक वाटी नाचणी पीठ
एक वाटी गुळ
एक वाटी ओला नारळ चव
वेलदोडे पूड आवडीनुसार..
बदाम काजू आवडीप्रमाणे
🍈कृती
प्रथम लाल भोपळा कीस एक चमचा तूप घालून वाफवुन घेणे
कीस मऊ झाला की तो बाजुला काढून
परत एक चमचा तूप घालून नाचणी पीठ खमंग भाजुन घेणे
ओला नारळ चव थोडे पाणी घालुन सरबरीत वाटून घेणे
🍈आता हे नारळाचे वाटण ,
लाल भोपळा, गुळ, नाचणी पीठ एकत्र करून
कढईत शिजायला ठेवावे
थोड्या वेळात मिश्रण घट्ट होइल
मिश्रण कढईच्या कडा सोडू लागले की तुप लावलेल्या थाळीत ओतुन थापून घ्यावे
🍈थोडा वेळ फ्रिज ला सेट करून
बाहेर काढून वड्या कापाव्या
आवडत असल्यास बदाम अथवा काजू सजावट.
🍈याच्या वड्या पाडायच्या नसतील तर नुसता सुध्दा खाता येतो
नाचणी व भोपळा यामुळे रंग चांगला येतो
चव छान लागते😋
पौष्टीक तर आहेच 😊