अगतिक
चोचित भरविलेल्या दाण्याचे प्रायश्चित्त घेतो आम्ही!
जिणे असे असाह्यतेचे जगतो आम्ही!
समजून उमजून केलेला कानाडोळा पाहतो आम्ही!
डोळस असुनही आंधळे होतो आम्ही!
अडचणीतून केलेल्या कर्तव्याचे नगारे वाजवितो आम्ही!
आमच्या अस्तित्वाचा एक प्रश्न होतो आम्ही!
वार्धक्यात तरूणाईचे वल्कले अकारण घालतो आम्ही!
आपल्यासोबत इतरांचे ओझे उचलून घेतो आम्ही!
आठवणींचे पिसे स्पर्शून जातात एकांती जेंव्हा!
रिकाम्या घरट्याची खिन्नता जाणवते आम्हा!
वाकुल्या दाखवी वाटा त्या वृध्दाश्रमाची आम्हा!
" थांबा " अगतिकतेचा असाह्यतेने शोधतो आम्ही!
@ सुहास शनवारे.
9850236657