संस्था आली कामाला पण सरकार कोणत्या गावाला :
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ,
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद पुणे, बालगंधर्व परिवार नृत्य परिषद आणि राष्ट्र सेवा दल कलाकार यांच्या वतीने दि 19 मे 2021 रोजी राष्ट्र सेवा दलाच्या आवारात अ.भा.म.चि. महामंडळाचे श्री मेघराज राजेभोसले आणि संचालक मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली जीवनावश्यक वस्तू किट वाटप करण्यात आले.या कोरोनाच्या बिकट परिस्थितीत कलाकारांना जिवंत ठेवण्याचं जे कार्य मेघराज राजेभोसले आणि महामंडळ यांनी केलं आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे........
जवळपास दीड वर्ष झाली कलाकारांच्या हाताला काम नाही. केवळ अ.भा.म.चि. महामंडळ यांचीच सभासद संख्या 48,500 ते 49,000 सभासद आहेत तसेच तमाशा, नाट्य कलावंत यांच्या कडे सरकार कधी लक्ष देणार या कडे कलावंतांचे लक्ष लागले आहे ? अ.भा.म.चि महामंडळाने प्रत्येक कलाकारांना दोन हजार रुपये बँकेत जमा केले होते आणि आजही त्यांचं कार्य अविरतपणे चालू आहे.
अशी माहिती-रहेमान यांनी दिली