लक्ष्मी प्राप्ती साठी श्रीसूक्त म्हणत असतांना
अर्थ माहीत असल्यास एकाग्रता होते.
"श्रीसूक्त"
"ऋचा ४"
कांसोस्मितां हिरण्यप्राकारां आर्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीम् | पद्मेस्थितां पद्मवर्णां तामिहोपह्वयेश्रियम् ||४||
अर्थ:--काम म्हणजे वाणी आणि मन यांना न कळणारी.लक्ष्मी ही एक शक्ती आहे आणि शक्ती ही नेहमीच अमूर्त किंवा अप्रकट असते असा भावार्थ.(असे असूनही ती ज्यावेळी भक्तांसाठी प्रगट
होते त्या वेळी) सोस्मिताम म्हणजे किंचित स्मित हास्याची रेखा जिच्या
मुखममंडलावर शोभते आहे अशा,नेहमी
हस्यमुख असणाऱ्या अशा, हिरण्यप्राकाराम:-जिच्या आस पास सोन्याची तटबंदी आहे किंवा सुवर्णाप्रमाणे देदीप्यमान आकृती जिची आहे अशा,अद्राम:- क्षिरोदधीतून लक्ष्मीचा जन्म झाल्या मूळे जी नेहमी आर्द्र जिच्या शरीरावरून पाणी निथळते आहे अशा किंवा भक्तांविषयीच्या कारुण्यामुळे जिचे हृदय द्रवत आहे,जिचे हृदय कारुणासान्द्र आहे.लक्ष्मीचे हृदय म्हणजे अक्षय करूणामृताचा वर्षाव
करणारा जणू वर्षाकालातील मेघ होय
असा आशय.ज्वलन्तीम:-दाहक तेजाच्या दिप्तीने शोभणाऱ्या किरणांनी
जिचे शरीर उजळून गेले आहे अशा.
तृप्ताम:-म्हणजे सदैव तृप्त किंवा प्रसन्न
असणाऱ्या, तर्पयन्तीम:-स्वतः तृप्त असून,पूर्णकाम असून जी भक्तांचेही मनोरथ अविलंबाने तृप्त किंवा पूर्ण करते अशा, पद्मे म्हणजे कामलात
स्थिताम-नेहमी असणाऱ्या, पद्मवर्णाम्:-पद्मा प्रमाणे कंतीमती,कमालाप्रमाणे जिचे बाह्यरुप आल्हाददायक आहे अशा,ताम श्रीयम म्हणजे त्या लक्ष्मीला
इह:-येथे माझ्या जवळ उपव्हये:-मी
बोलावतो.