"श्रीसुक्त"
"ऋचा ३
अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीम् | श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मादेवी जुषताम् ||३||
अर्थ:- अश्वपूर्व;- पूर्व म्हणजे प्रथम आणि अश्व म्हणजे घोडे-सैन्य होय.ज्या सैन्यात प्रथम दौडत येणारे घोडे दृष्टीस पडतात असे सैन्य,आणि रथमध्यांम-घोड्याच्या नंतर त्या सैन्याच्या मध्यभागी
रथ चालत आहे ते रथमध्य सैन्य होय.
हस्तिनादप्रबोधिनिम:- हत्तीच्या आवाजाने जी जागी होते.हत्तींनच्या आवाजामुळे ते सैन्य लांबून ओळखता येते.देवीम म्हणजे घोडे,रथ आणि हत्ती
यांच्यामुळे एकप्रकारचे सामर्थ्य ज्या सैन्यात निर्माण झाले आहे अशा श्रियम म्हणजे सैन्याचे रूप धारण करणारी जी
श्री म्हणजे लक्ष्मी तिला,सैन्यारुपधारिणी
लक्ष्मीला उपव्हये-मी पाचारण करतो.मी
बोलावतो.मी बोलावलेली ही सेनेचे रूप
धारण करणारी लक्ष्मी,मा--जुषताम :-निरंतर माझाच आश्रय करो,माझ्याच घरी तिचा निवास,सैन्याचे रूप धारण केलेल्या लक्ष्मीचे वास्तव्य निरंतर असो.
ज्या वेळी लक्ष्मी सैन्याचे रूप धारण करते त्या वेळी संपत्ती तर मिळतेच पण
त्याच बरोबर सत्ताही प्राप्त होते.संपत्ती
बरोबर सत्ताही मला प्राप्त होवो हा
स्थूल आशय.
लक्ष्मी ही एक स्वतंत्र परंतु सर्व प्रकाशक
अशी प्रचंड शक्ती आहे,दिव्यात जशी ज्योत तशी.त्या ज्योतीमुळे दिव्याची प्रभा जशी सर्व दूर फाकते तशीच या लक्षीमुळे सर्व भौतिक पदार्थातून एक तऱ्हेची प्रभा फाकत असते.