#######Good earlier morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
ॐ अमृत-वाणी * अभंग तुकारामाचे ॐ
-----------------------------------------------------------
*अभंग*
नेञ झाकोनिया काय जपतोसी ! जव नाही मानसी प्रेमभाव !!
ऊघडा मंञ जाणा रामकृष्ण म्हणा ! तुटती यातना गर्भवास !!
मंञयंञ काही करीसी बुटबुटी ! तेणे भुतसृष्टी पावशील !!
सार तुका जपे बिज मंञ एक ! भवसिंधू तारक रामकृष्ण !!
??संत तुकोबारायांनी जे ढोंगी बुवा बाबा साधू लोक आहेत,त्यांचे वर टिका तर केलीच परंतु त्यांच्या तपसाधना,त्यांचे गुरूमंञ यावरही हल्ले चढवले आहेत.सदरील अभंगात वारकरी संप्रदायाचा गुरूमंञ हा कसा सोपा आणि भवतारक आहे ते तुकोबारायांनी पटवुन सांगीतले आहे.ईतर कुठल्याही ऊपासना किंवा मंञतंञ जपतप करण्याची गरज नाही असे सदरील अभंगातुन तुकोबारायांनी सांगीतले आहे.
संत तुकोबाराय म्हणतात की,डोळे बंद करून ध्यानाला बसुन,हातात माळ घेऊन कशाचा जप करतोस.जर मनात प्रेमभावच नाही,देवाबददल भक्तीभावच नाही.मनात वाईट विचार भरलेले आहेत.मन विषय वासनेने बरबटलेले आहे तर या माळेचा जप करण्याचा काय फायदा.या पेक्षा साधा,सोपा ऊघड असलेला वारकरी संप्रदायाचा गुरूमंञ रामकृष्ण हरी हा जो आहे तो जपा.या मंञजपाने सर्व यातना,दु:खे नाहीशी होतात.या मंञाने मुक्ती मिळेल.पुढे तुकोबाराय म्हणतात की,मंञ,तंञ,जप तप हे जे काही तुम्ही तोंडाने बुट बुट करताय ना हे सगळे चुकीचे आहे.या ऊपासनेने काहीही फायदा नाही.याच्या जपाने तुम्ही भुतसृष्टीत जन्म घ्याल.
शेवटच्या कडव्यात तुकोबाराय म्हणतात की,मी स्वत: हा बिजमंञ,गुरू मंञ याचा जप करतो.या भवसागरातुन मुक्तता मिळवण्याची,या भवसिंधुतून तरून जाण्याची ताकत या वारकरी संप्रदायाच्या नाममंञात आहे.
थोडक्यात संत तुकोबारायांचा हा नामपर अभंग आहे.या अभंगातुन वारकरी संप्रदायाच्या नाममंञाचे महत्व तुकोबारायांनी प्रतिपादन केले आहे.ईतर सर्व ऊपासना,जपतप हे सर्व थोतांड आहेत.त्यापासुन काहीही फायदा होणार नाही.तुम्ही कितीही जपमाळ करा.परंतु मनातील विषयभावनाच संपल्या नसतील तर सर्व जपतप बिनकामाचे आहेत असे तुकोबारांयानी सांगीतले आहे...!!
|| जय जय रामकृष्ण हरी ||
प्रस्तुतीः मच्छिंद्र माळी , पडेगांव,औरंगाबाद.
?????