####Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
" अभंग वाणी संताची "
-------------------------------
*****************************
नको मुर्ती सोंग | जे आहे ते दावा अंग ||१|
आम्ही लेकुराळे दास | का वैरी वाटे तुम्हास ||२||
दाता घेता भेटी | मनी पाहे खरे खोटी ||३||
दिपा म्हणे तु जाणता | तरी का रे अजाणता ||४||
अर्थ:- पांडुरंगाला साष्टांग स्वरुपी येण्यासाठी केलेल्या विनंती बद्दल सांगताना सांगावेसे वाटते की, "आता हे मुर्तित असलेलं सोंग नको, जे आहे ते तुम्ही साष्टांग दाखवा. ||१|| अहो, आम्ही तर तुझे लेकरा समान तुझेच भक्त आहोत. तुम्हाला आम्ही काय तुझे वैरी वाटत आहे का? ||२|| अहो, दाता आणि घेता समोरासमोर आल्यावर हट्टाचा प्रसंग निर्माण होणारच आणि तुम्ही तुमच्या मनाला विचारुन पहा आमचा हट्ट योग्य आहे की नाही. ||३|| देवा, भक्तांचे भाव तर तुम्ही एका नजरेत ओळखता, मग आडाण्या सारखे वागता कशाला? "||४||
*****************************
रचना आणि भावार्थ:- श्री संदिप पांडव