####Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
" विचार पुष्प "
-------------------
???????????
*??।। जय श्रीकृष्ण।।??*
*माणसे पुष्कळ नाम घेतात. त्याने पुण्यसंचय झाल्याशिवाय राहात नाही. पण नाम अध्यात्माच्या भूमिकेवर चालणे म्हणजे काय हे समजणे जरूर आहे. भगवंताचे नाम घेताना आपण भगवंताचे नाम घेत आहोत हे भान सारखे टिकत नाही. तसेच नामापरते सत्य नाही ही जाणीव राहात नाही. म्हणून जेथे जिवंत नाम चालते तेथे त्याच्याबरोबर भगवंताच्या अस्तित्वाची जिवंत जाणीव वास करते. मुखामध्ये भगवंताचे नाम आणि आतमध्ये भगवंताचे ठाण अशी अवस्था झाली की शमदमादि साधनचतुष्टय आपोआप अंगी बाणतात. त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. कारण भगवंताचे नाम शक्तिरूप आहे. याचा अर्थ असा की नाम घेणाऱ्याचे मन ते बदलून टाकते. भगवंताचे दर्शन होण्यास जे मन लागते ते मन नाम तयार करते. अशा रीतीने समबुद्धीने नाम घेतले की भगवंताचे अस्तित्व मनामध्ये खोल जाते व अखेर माणूस ख-या अर्थाने माणूस होतो.*
*??।।राम कृष्ण हरी।।??*
*???शुभ प्रभात???*
???????????