अंजना
अंजना ला प्रथम भेटले
ते बँकेच्या एका शैक्षणिक कोर्समध्ये
मला भेटल्या क्षणी आवडली ती आणी ती तर माझ्या प्रेमातच पडली जणु
एका क्षणात भरपूर बडबड करू लागली अंजना ..जणू काही आमची जुनी ओळख आहे .असे
वय पंचवीस् च्या आसपास ..
साधारण उंची मध्यम बांधा ..सावळा रंग
चेहेर्या वर एक आत्मविश्वास
आणी सगळ्यात विशेष डोळ्यात भरणारे तीचे मोठ्ठे मोठ्ठे काजळ भरले डोळे
उत्तराखंड ची असणारी अंजना हिंदी भाषिक होती
आम्ही ट्रेनिंग सेंटर च्या होस्टेल ला एकत्र एका खोलीत रहाणार होतो
एक आठवडा भर मुक्काम असणार होता आमचा
माझे कवितांचे पुस्तक पाहून तीला माझा अभिमान वाटला
ती म्हणाली
अगर मुझे पढना आता मराठी तो मै पढ सकती ये किताब
मग मी तिच्या वरच एक कविता केली .
ती खुप च खुष होऊन गेली
क्लास मधल्या साऱ्या लोकांना कौतुकाने ती हे सांगत होती
.पुण्यातील आठ दिवस आम्ही खुप मजा केली वेगवेगळ्या प्रकारचे फोटो काढले रात्र रात्र जागून गप्पा केल्या …वेगवेगळी ठिकाणे मी तीला संध्याकाळी फिरून दाखवली .एकमेकींच्या पसंतीने कपडे दागिने याची खरेदी पण केली
एक दिवस तर पुण्यात तुफान पाऊस पडत होता
तरी पण आम्ही अगदी हट्टाने रात्रीचा पिक्चर पहायचे ठरवले
खुप अडचणी आल्या त्या दिवशी पण जिद्दीने आम्ही आमची इच्छा पुर्ण केलीच तेव्हा तर तीला खुपच मजा वाटली ..
अखेर शेवटचा दिवस आला आणी शेवटच्या क्षणी आमच्या ताटातुटी ची घडी आलीच ..
तिची रेल्वे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी होती
मला मात्र त्याच संध्याकाळी बसला बसायचे होते .
होस्टेल मध्ये फक्त दोघीच राहिल्या होत्या
मी अंजना ला म्हणले
| आज अकेली मत सोना दोनो साथमे सोना ..
अंजना म्हणाली ..
नही हम् अकेले कहा है मेरे साथवाले बेड पर तुम्हारी यादे है
मै यही सो जावूंगी ..
या वाक्या पुढे मी निरुत्तर होते ..
अंजना ने मला घट्ट मिठी मारली आणी शेवटचे रडून घेतले
यानंतर ती मला हसत हसत रिक्षा पर्यंत सोडायला आली
आता ट्रेनिंग संपून पंधरा दिवस झाले
रोज अंजना चे.... मिस यू ..असे दोन तरी मेसेज असतातच ..