Marathi Quote in Poem by vrunda

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

🌿🌿🌿🌿🌿


ऐक ना...

कविता  म्हणजे काय...??

मनाने मनाला घातलेली साद,
की शब्दांनी शब्दांशी केलेला वाद...
कल्पनांंची नुसतीच एक शृंखला,
की सहजच गुंफलेली अक्षरमाला...

यापैकी काही नाही....!!

काही नाही..??

 कल्पना कशी म्हणायची याला,
यातील प्रत्येक क्षण कुणीतरी जगल असेलच...
जगाच्या पाठीवर कधीतरी कुठेतरी,
प्रत्येक दु:ख ओघळल असेलच...

आयुष्य नसते नेहमीच कविता,
असतो मनाच्या पटावर मांडलेला डाव..
जिथे हरण्याचीही नसते मुभा,
अन् जिंकण्याचाही नसतो ठाव...

शेवटी जर हातात काहीच उरणार नसेल,
तर कशासाठी करायचा हा अट्टाहास...
का द्यायचं झोकून स्वतःला,
का घ्यायचा एवढा कवितेचा ध्यास...

हम्म..!!...पण...

अश्रु बरसतीलच पाऊस बनून कोरड्या मातीवर,
त्यातूनच उमटतील नवे अंकुर नवे तरंग...
आणि आयुष्याच्या जुन्याच चित्रात भरला जाईल,
कदाचित नविनच आवडता रंग...

माहित आहे..

आयुष्य आपल कविता नाही,
ती तर मोहर आहे उमटलली,
 आपण जगलेल्या क्षणावर...
आपल्याच आयुष्याच प्रतिबिंब,
आपणच उतरवलेलं असत,
अलवारपने मनातून ..कागदावर...

हो ना....!!



🌿🌿🌿🌿🌿🌿

Marathi Poem by vrunda : 112024363
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now