पैसा 💯🔥💫
असते अशी एक गोष्ट, जी नसते बर का आयुष्यात स्वस्त.
तिला मिळवायला करावे लागतात कष्ट. ज्याच्याकडे असते ती जास्त तो राहतो आरामात मस्त.
श्रीमंतांकडे असतो तू भरभराट पण गरीब माणूस मात्र तुला मिळवण्यासाठी करतो करकराट.
प्रत्येकाला तू हवाहवासा वाटतो.
पण जेव्हा तुला कमावण्याची वेळ येते तेव्हा मात्र सर्वांना घाम फुटतो.
तू तर आहे खूप मौल्यवान
तू मिळतात भल्याभल्यांना हरपतं त्यांचं भान.
लोक मानतात तुला खूपच महान, श्रीमंतांची तु शान.
मनुष्य बोलत नाही पैसा बोलतो असं म्हणतात लोक .
तू असलास की पुरवू शकतात ते आपले शौक.
ज्याच्याकडे असतो तो खूप तो दाखवतो त्याचे खरे रूप 👍
तुझा आता सर्व गैरवापर करतात.
तुझ्या जीवावर श्रीमंत लोक एश करतात , आणि गरिबाला मदत करण्याची वेळ आली की नकार देतात.
ही परिस्थिती आहे पैशा तुझी.
पण तुझी किंमत कळावी हीच इच्छा माझी.
मग तुझा उपयोग काय?
अरे पण तू गरिबांची माय.
नको बनवू श्रीमंतांची साय.
म्हणून पैशाचा योग्य उपयोग करा कारण या जगात पैशाचे खूप मौल्य आहे💫💫💫💫💫
स्वरचित कविता प्रेरणा देवेंद्र वाघ