The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
स्त्री तू दुर्गेचा अवतार 🚩🚩🙏 अगस्त्री तू दुर्गेचा अवतार करू शकतेस तू भल्याभल्यांना ठार. उचलून तलवार कर त्यांचा संघार. कमी समजू नकोस तू स्वतःला तू आहे जिजाऊ ची लेक आणि सावित्रीबाई ची लेक. मुलांसाठी मायेची ममता तू तर दैत्यांसाठी दुर्गेचा अवतार तू. ओळख शक्ती स्वतःची तू साक्षात जगदंबा तू . शिक्षणातही विज्ञानातही सर्व क्षेत्रात पुढे तू. ओळखली आहे शक्ती स्वतःतली तू तर आता मागे वळून बघू नकोस तू. जगातला शक्तिशाली व्यक्तीही घेतो तुझ्या कुशीतून जन्म. अगं तूच तर आहेस या संपूर्ण सृष्टीचा जन्म. कर अन्यायाला ठार तू उचल त्रिशूल आणि संघार तू घाबरू नकोस तिन्ही लोकांवर कर जय जय कार तू. या सृष्टीची अस्मिता तू ,भवानीचा वार तू साक्षात या सृष्टीची पालन हार तू, काय म्हणू तुला अग महाकाली तू ,की दुर्गा तू ,उत्तर एकच साक्षात जगदंबा तू ..... dedicated you all my ladies you are the power my dear 🚩🚩🚩💫💫💫🔥🔥🔥🔥🔥💯💯 स्वरचित कविता प्रेरणा देवेंद्र वाघ.
कवितेचे नाव मन एक बाजार 🥰🤝🤝🤝 काय करावं कधी हसावसं वाटतं, त्यातच त्यात मनात कुठेतरी दुःख येऊन बसतं. काय कमाल आहे म्हणा मनाची, कधी अश्रू स्वरूपे रडतं तर कधी हसूस्वरूपी हसत. एक वेगळाच बाजार चालतो या मनात प्रत्येक भावनेची ऐकावी लागते बात. यामध्ये जीव मात्र पडतो गोंधळात. काय करावं मात्र मनाला कळत यात. शेवटी मात्र एकच पर्याय उरतो मेंदू येऊन भावनांची वजाबाकी करतो. सर्व भावनांचा खेळ तो मांडतो आणि मग त्यावर विचार तो करतो उपाय काहीतरी भेटतो त्यातून मनालाही शांत वाटतं मग अंतकरणातून. मनालाही मग आनंद मिळतो आणि भावनांचा हा बाजार येथेच सरतो. शेवटी आनंद अश्रू भरून मन मेंदूला म्हणत. तुझ्या साथीने माझा कार्य हे सोपं होऊन जातं. मेंदू म्हणतो मनाला हाच फरक उरतो तू नेहमी भावनांचा विचार करतोस, आणि गोंधळात पडतो. आणि मी मात्र माझ्या बुद्धीने विचार करतो आणि हे भावनेचं कोड येथेच मोडतो. बरोबर आहे मित्रा तुझं तुझ्याशिवाय मी अपूर्ण. आपल्या दोघांची मैत्री करते आयुष्याला संपूर्ण येऊण मन मेंदूला म्हणतं आपल्या मधून कोणीच नाही जेष्ठ . विचार करून म्हणतो तूच आहे श्रेष्ठ. ही कविता फक्त कविता नव्हे तर आपल्याला शिकवते की भावनां चा विचार करणं महत्त्वाचं असतं पण मग नेहमीच भावनांच्या गोंधळात गोंधळून राहण्यापेक्षा मेंदूची मदत घेतली तर नेहमी आपण यशस्वी होऊ शकतो. 🥰💫💫🤝💯💯 स्वरचित कविता प्रेरणा देवेंद्र वाघ
पैसा 💯🔥💫 असते अशी एक गोष्ट, जी नसते बर का आयुष्यात स्वस्त. तिला मिळवायला करावे लागतात कष्ट. ज्याच्याकडे असते ती जास्त तो राहतो आरामात मस्त. श्रीमंतांकडे असतो तू भरभराट पण गरीब माणूस मात्र तुला मिळवण्यासाठी करतो करकराट. प्रत्येकाला तू हवाहवासा वाटतो. पण जेव्हा तुला कमावण्याची वेळ येते तेव्हा मात्र सर्वांना घाम फुटतो. तू तर आहे खूप मौल्यवान तू मिळतात भल्याभल्यांना हरपतं त्यांचं भान. लोक मानतात तुला खूपच महान, श्रीमंतांची तु शान. मनुष्य बोलत नाही पैसा बोलतो असं म्हणतात लोक . तू असलास की पुरवू शकतात ते आपले शौक. ज्याच्याकडे असतो तो खूप तो दाखवतो त्याचे खरे रूप 👍 तुझा आता सर्व गैरवापर करतात. तुझ्या जीवावर श्रीमंत लोक एश करतात , आणि गरिबाला मदत करण्याची वेळ आली की नकार देतात. ही परिस्थिती आहे पैशा तुझी. पण तुझी किंमत कळावी हीच इच्छा माझी. मग तुझा उपयोग काय? अरे पण तू गरिबांची माय. नको बनवू श्रीमंतांची साय. म्हणून पैशाचा योग्य उपयोग करा कारण या जगात पैशाचे खूप मौल्य आहे💫💫💫💫💫 स्वरचित कविता प्रेरणा देवेंद्र वाघ
नशीब 💫💯🔥 आज प्रश्न पडला म्हटलं असं काय असतं नशीब ? सर्वजण देतात दोष त्याला ते का हे नशीब. आजच्या लोकांचे कसं झालं आहे माहिती आहे का. की काहीही वाईट झालं तर म्हणतात हा नशीबाचा खेळ आहे का?. लोक जरी म्हणत असली तरी मी म्हणणार नाही. कारण त्या कोणत्याही गोष्टीला नशीब जबाबदार नाही. पण मग याला आज जबाबदार कोण नशीब की कृत्य. उत्तर मात्र एकच कृत्य. नशीब फक्त निमित्त तुम्ही केलेले कर्तुत्व हेच एकमेव सत्य. त्यामुळे कृत्य करत चांगले घडेल आयुष्यात नेहमी चांगले राहू नका नशिबाच्या भरोशावर स्वप्न पूर्ण करा कर्तुत्वाचा बळावर. नशिबावर कर्तुत्व ठरत नाही कर्तुत्वावर नशीब ठरतं. आणि या परिस्थितीला जबाबदार कोण? याचा कर्तुत्व हे एकमेव उत्तर उरतं. म्हणून नेहमी नशिबाला दोष देत बसू नका तर चांगले कर्म करा 💯💯🔥💫💫 स्वरचित कविता प्रेरणा देवेंद्र वाघ.
देव आहे का? 🚩🙏✨ आज बोलावसं वाटलं या विषयावर. देव आहे का हा प्रश्न पडला सगळ्यांच्या मनावर. विज्ञान श्रेष्ठ की देव श्रेष्ठ कळत नाही. पण देव म्हणजे काय हे आपण समजलं नाही. विज्ञान सांगतं विश्व कसं निर्माण झालं, आणि अध्यात्म सांगतं की विश्व का निर्माण झालं. यावरून देव आणि विज्ञान यातील वेगळेपण मला समजू लागलं. अहो देव म्हणजे काय हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात. पण देवाची मूर्ती मात्र असते प्रत्येकाच्या घरात. अहो देव म्हणजे दगडाची मूर्ती नाही, तर भावना, सत्यता, प्रत्येक व्यक्तीत दडलेला असतो देव. अरे गोंधडू नकोस भावनांच्या भरात फक्त एकदा देवावर विश्वास ठेव. देव तुला दिसणार नाही पण जाणव मात्र शकतो. म्हणूनच तर संकटाच्या वेळी देवा आता तूच सांभाळ! असे आपण म्हणतो. देव प्रत्येकात दडलेला असतो फक्त त्याला असतो. आई-वडिलांसारखा तोही आपल्याला बोट धरून चालायला शिकवतो. घरातली ती माऊली म्हणजे देव, कष्ट करणाऱ्या बापात आहे देव, या सृष्टीतील प्रत्येक प्राण्यात आहे देव. संकटात तुला दिसणार नाही पण जाणवेल मात्र फक्त तू विश्वास ठेव. देव म्हणजे न्याय देव म्हणजे सत्यता, देव म्हणजे भावना आणि देव म्हणजे प्रेम, हेच आहे देवाची संकल्पना. देव म्हणजे फक्त दगडाची मूर्ती ही नका ठेऊ भावना. देव आणि विज्ञान हे फक्त माध्यम आहे जगण्याचे. पण दोन्हीही श्रेष्ठ आहेत शिकवतात आपल्याला मूल्य आयुष्याचे . त्यामुळे देव शोधू नका कुठे भेटेल देव तुम्हाला तुमच्याच मध्ये. मदत करा सत्य रहा भरभरून जगा आयुष्य. शेवटी देव व विज्ञानानेच घडवला आहे मनुष्य. शेवटी एकच म्हणेल देव अनुभवा व विज्ञान जगा🚩💯💯👍🙏✨✨🥰 राम कृष्ण हरी 🚩🚩 स्वरचित कविता, प्रेरणा देवेंद्र वाघ
शिक्षक✨✨🙏💯🥰🙏✨ वाट होती अवघड जिद्द तुम्ही दिली. तुमच्यामुळे लढण्याची नवी आशा जागली. कुठे होते मी आणि आज कुठे आहे मी. तुमच्यामुळे यशाची वाट नवी दिसली माझं मन होतं एक निरागशी बाग. त्यात ज्ञानाचे फुलं तुम्ही उमवले. मी शिकावं म्हणून किती हो तुम्ही धडपडले. आज मनापासून वाटतं मास्तर येऊन तुमचे पाय धरावे. आई-वडिलांनंतर तुमचे उपकार मी कसे फेडावे. तुमचे आभार कसे मांडू हेच मला कळत नाही. या जन्मी मात्र मी तुमचे उपकार कधीच फेडू शकत नाही. वाटत कधीतरी मनाला तुम्ही नसता तर काय झालं असतं. जगाच्या या अंधारात आयुष्य मरगळून गेलेलं असतं. अ आ इ पासून सुरु झालेला हा प्रवास, कधी इंग्रजीच्या भरदार पुस्तकांपर्यंत येऊन पोहोचला हे मला माझंच कळलं नाही. पण आजही आठवते मला, तुम्ही कौतुकाने केलेले गृहपाठाच्या वहीवरील सही. आई नंतर माझे बोबडे बोल तुम्हीच समजून घेतले. आणि माझे स्वप्न सत्यात यावे यासाठी तुम्ही खूप कष्ट घेतले. एकच म्हणेल शेवटी आपणच आहात श्रेष्ठ कारण जे ज्ञानपुन्याचे काम करतात तेच असतात खरे श्रेष्ठ. गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः 🙏🙏🚩💯💯🙏🙏🙏🙏🙏🥰🥰 माझ्या सर्व शिक्षिकांसाठी व शिक्षकांसाठी ही एक कविता 🥰🙏🙏🙏✨💯 स्वरचित कविता प्रेरणा देवेंद्र वाघ....
Copyright © 2026, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser