त्यांच्या अपेक्षांचे ओझे वाहताना,
तो वाकतो जरासा पुढे चालताना..१
डोळ्यापुढे रस्ता ओळखीचा असताना,
तो धडपडतो जरासा कोणी नसताना..२
आयुष्याचे काय कळले नसताना,
तो थांबतो जरासा नमस्कार करताना..३
त्यांच्या प्रश्नांचे योग्य उत्तर नसताना,
तो घासतो रस्ता रोज घरी जाताना..४
©सुर्यांश