Marathi Quote in Poem by digi Poetess

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

शिर्षक- अबोल नाती

नको अबोला नात्यात आता
की त्यास त्याची सवय व्हावी
अबोल भाषेतूनी एक आता
गोड शब्दांची माळ व्हावी!१!

विसरूनी जावी ती रुसवी आठवण
भेटण्याची त्यास ओढ असावी
नको अंतर नात्यास आता
की त्यास आपुल्याची आठवण व्हावी!२!

कुठे अंतरीची एक खंत बोलते
त्यास आपुल्यांची वाट दाखवून द्यावी
नको कोणती या मनी सल आता
जुनी जळमटे सारी निघुनी जावी!३!

घट्ट मिठित सारी विरुन जाता
मुठीत ही नाती जपून ठेवावी
मनाच्या लहरीवर लिहुन ठेवता
नाती आयुष्यभर सोबत राहावी!४!
- अभिलाषा देशपांडे
- मुंबई

Marathi Poem by digi Poetess : 111686690
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now