Marathi Quote in Motivational by Archana Rahul Mate Patil

Motivational quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा...
एक आईचा आईचा..एक ताईचा..🥰


बाहुली होते खेळ खेळाया..
जाहली मोठी मोहरे काया...
घमघमे सारा गंध जाईचा...🤗

काय मी सांगू काय हे झाले ..
माय ही सांगे अर्थ मायेचा..
का तुलासखये नाहने आले..🥰

मुल होताना ही कळी लाजे..
पैंजणा पासी काय हे वाजे ..
शोधते आता हात साथीला...🌝

जानवे आता वेगळे काही..
रंगल्या साऱ्या या दिशा दाही..
भास कोणाचा रोज रातीचा...🤗

जन्म बाईचा बाईचा ..खूप घाईचा ...
एक आईचा आईचा ..एक ताईचा..🥰

या ओळी मध्ये खरंतर एका मुलीचं कसं सी मध्ये रूपांतर होतं आणि त्याचीच कसं मातृत्व !!!!हे यथाअर्थ वर्णन केला आहे...खरंच स्री अवतारच एक अवर्णनीय असा आहे.. श्री ही कुणाची आई कुणाची ताई ,कुणाची आजी ,तर कुणाची अर्धांगिनी बनून राहते ..तिच्या शिवाय प्रत्येक नातेही अपूर्णच...🌝

अर्धांगिनी बनून आयुष्य परिपूर्ण करणारी आदिशक्ती श्री.. हिला जेव्हा मातृत्वाची चाहूल लागते तेव्हा तिला अनेक दिव्यातून सामोरे जावं लागतं.. ज्यावेळी गर्भाची चाहूल लागते अगदी त्याच क्षणापासून तिला अनेक यातना सहन कराव्या लागल्या..परंतु प्रत्येक वेदना ती फक्त आपल्या बाळासाठी सहन करत असते.. सुरुवातीचे काही दिवस तिला अन्न तर काय पाणी सुद्धा पचत नाही..

तरीसुद्धा ती बाळाच्या चाहुलीने आनंदमय राहते...तिला कधी आंबट तर कधी गोड, कधी तिखट तर कधी काहीही खावसं वाटतं ...किंवा कधीकधी काहीच खाऊ शकत नाही एवढी कडक डोहाळे लागतात...तिला आवडतो ओल्या मातीचा सुगंध तर कधीकधी खावीशी वाटते तीच माती.. प्रत्येकाचे वेगवेगळे डोहाळे..✍️✍️💞Archu💞

हळूहळू बाळाच्या अस्तित्वाची जाणीव होते बाळाचे हलणे बोलणे... तेही बाळाशी हितगुज करायला लागते..आपल्या इतिहासातही अनेक अशा नोंदी आहेत की गर्भातच बाळाला आईकडून जे संस्कार प्राप्त होत असतात ते त्याचे आयुष्य परिपूर्ण बनवण्यासाठी सिद्ध करत असतात..
अभिमन्यू सारख्या महा पुरुषाने देखील उत्तरेच्या गर्भातच विद्या ग्रहण केली होती.. आणि म्हणूनच आजही गर्भसंस्कार म्हणून डोहाळे जेवण करतात,..🙂

खरं तर या विषयावर खूप काही लिहिण्यासारखे आहे पण थोडं आवरतच घेते आणि थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न करते..🌝

गर्भ संस्कार करण्याचे पूर्वीपासूनच प्रथा चालत आली आहे.. पण आता त्यासाठी डॉक्टरांकडून ही आपल्याला योग्य ते मार्गदर्शन केलं जातं.. शिवाय इंटरनेट आणि गुगलबाबा तर आहेच की आपल्या मदतीला...😂😂


तर सातव्या महिन्यात स्री गर्भार असताना तिचे डोहाळे पुरवले जातात.. यामध्ये तिला जे जे खावसं वाटलं तो श्री हट्ट म्हणून पुरवला जातोच... पण डोहाळे जेवणाचा कार्यक्रमही केला जातो.. यामध्ये शक्यतो सातव्या महिन्या मध्ये आपल्या माहेरी जाऊन आपल्या आईच्या चा हाताने पहिली ओटी भरण्याचा मान असतो... त्यानंतर इतर पाच सुवासिनी तिला काही गोडधोड खाऊ घालून खणा-नारळाने ओटी भरतात..🥰

यामध्ये अनेक प्रकारची फळे वेगवेगळी मिठाने तसेच पंचपक्वानाचा ही समावेश असतो.. कोरी करकरीत हिरवी साडी किंवा शालू,हातात हिरव्या बांगड्या, पायात पैंजण कडे तोडे, नाकात नथ ,केसांना माळलेला गजरा.. कमर बंद, बाजूबंद, बिंदी... व अनेक फुलांच्या माळा घालून सजवला जात..🤗

दोन वाट्या मध्ये बर्फी किंवा जिलेबी, आणि पेढा ठेवला जातो..यावर झाकण ठेवुन तिला कोणताही एक निवडण्यास सांगायचं... जिलेबी निघाली किंवा बर्फी निघाली कधी गोड मानून एकमेकांना खाऊ घालतात...🤗
.थोरामोठ्यांचा आशीर्वाद घेऊन कृष्णासाठी पाळणा व अंगाई गीत गायले जाते... अशाप्रकारे हे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होतो..

🌝पण आता अशा कार्यक्रमासाठी अनेक थीम्स असतात...जेवढी मोडन लोक झाले तेवढी किंबहुना त्यापेक्षा अधिक जय्यत तयारी या कार्यक्रमाची केली जाते... अनेक प्रकारचे फोटोशूट व इतरही भरपूर लवाजमा असतो..!! तुमच्याकडे डोहाळे जेवण कसे केले जाते ???🙂हे मला नक्की सांगा..!!!✍️✍️💞Archu💞

Marathi Motivational by Archana Rahul Mate Patil : 111678882
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now