अस्तित्वाचा शोध
कविता करून पोट भरत नाही
कवितेने जीवनाचा प्रश्न सुटत नाही
तरी ही कविता का करतोस ?
या एका प्रश्नाने कवी भावुक होतो
कविता म्हणजे त्याच्या जीवनाचा बोध
कविता हेच त्याचा अस्तित्वाचा शोध
एकदा एक व्यक्ती सहज म्हणाला
तुम्ही कवी आहात का ?
कवी मनाला हे ऐकून आनंद झाला
तो म्हणाला तुम्हांला हे कसे कळले ?
मघापासून पाहतो तुम्ही स्वतः पुटपुटता
मनातल्या मनात काही तरी बोलता
असे हे वागणे कवीचं असते तो म्हणाला
त्याला धन्यवाद देत कवी म्हणाला
तुम्ही असे पहिले व्यक्ती आहात जे
मला पागल न म्हणता कवी म्हणाला
लोकांना कवी म्हणजे जरा वेडाच वाटतो
तो आपल्याच विश्वात सदा रममाण राहतो
कवी आपले सुख, दुःख, आणि कल्पना
त्यातून तयार करतो नाना अनेक रचना
- नासा येवतीकर