Marathi Quote in Poem by Na Sa Yeotikar

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

।। कामधंदा ।।

मिळालंय वेळ तर आजच घे रडून
किती दिवस राहणार आहेस असा सडून

मिळेना कामधंदा फिरतो गर गर गर
ओरडू नको काय होणार आता चिडून
किती दिवस राहणार आहेस असा सडून

शिक्षण घेतलं खूप नाही शिकला काम
नोकरी मिळेना म्हणून राहतो घरात पडून
किती दिवस राहणार आहेस असा सडून

सोबती असलेले गेले पुढे केली प्रगती
मिळेल काम म्हणत बसला पाय दुमडून
किती दिवस राहणार आहेस असा सडून

कोणी मला मदत करतील या आशेवर
सध्या भरवसा ठेवू नको कोणाकडून
किती दिवस राहणार आहेस असा सडून

- नासा येवतीकर, 9423625769

Marathi Poem by Na Sa Yeotikar : 111465237
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now