#शोभेच्या
बहरू दे अशीच कविता
उत्तम रचना होवो तयार
मनातल्या व्यथा वेदना
कवितेतून होऊ दे पसार
कल्पनेतून मनात आली
वेदनेतुन काव्य लिहिली
अनुभव मोठा गुरू असे
कैफियत शब्दांत मांडली
शोभेच्या वस्तू नाही कविता
अंतर्मनातील आहे वेदना
अबोल सारे बाहेर पडती
होत असतील ज्या यातना
- नासा येवतीकर