Marathi Quote in Story by योगेश जोजारे

Story quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

बोगीत जाऊन त्याने पटकन विंडो सीट धरले.
घरी कॉल करून झाला प्रकार सांगितला. बॅट्री लो आहे मी पोहोचतो म्हणतं फोन कट केला.गाडी निघाली थोड्याच वेळात गार वाऱ्याने रवी झोपी गेला, तो उठला तेव्हा गाडीत तो एकटाच होता. त्याने बाहेर पाहिले, त्याचा स्टॉप हा रेल्वेचा मुक्कामी स्टॉप असल्याने तो योग्य तिथेच उतरला होता. दीर्घ श्वास सोडत त्याने समोरच्या घड्याळात वेळ पाहिला रात्रीचे १:३५ भुवया उंचावित, घाबर्या नजरेने रवीने आजूबाजूला पाहिले. सोबतिला कोणीच नव्हतं. स्टेशन बाहेर पडताच भटक्या कुत्र्याचं एक टोळकं भो~~ भो ~~ करत एका जागेवर जाऊन मोठमोठ्या ने ऐका सुरात युवळू लागलं.
सम्पूर्ण काळोख, दूर इन्ट्री गेटवर एक लाईट टीमटीमत होता. हिम्मत करून रवी गेट कडे निघाला. गडद्द काळोख, मधेच उडणारे मोठे किडे, टक टक असा स्वतःच्याच बुटाच आवाज, या वातावरणामूळ रवी चांगलाच घामाघूम झाला. कसाबसा तो गेट पर्यंत आला,
घराकडे जाण्यासाठी तो इकडे तीकडे वाहन बघू लागला. तर त्याचे लक्ष त्या वडाच्या झाडकडे गेले, रवी आणखीनच घाबरला. वडाच्या लोम्बणार्या पारंब्या, मधेच वडाला गोल गोल फिरणारे  दोन चार वटवाघूळ. मंद लाईटच्या प्रकाशात दिसत होते. तिकडून नजर चुकवत तो पुढे निघणार, तेवढ्यात त्याच्या खांद्यावर अनोळखी हात ठेवत, त्याला घोगऱ्या आवाजात कोणी तरी विचारले
" कुठं जाणार साहेब " त्याची छातीची धडधड वाढली, आवाजाच्या दिशेने त्याने पाहिलं. रुंद कपाळ, डोक्यावर बारीकसारीक केस चेहरा जरगट, कसल्यातरी माराने फाटून कपाळावर,गालावर,डोक्यावर पडलेल्या जाडजाड टाक्याचे निशाण ठळक दिसत होते.त्याचा अवतार पाहून रवीची तर बोबडीच वळली.



कोण हा रवी ?
कसा गुरफटला एका मंतारलेल्या प्रसंगात ?
त्या रात्री रवि सोबत पुढे काय घडले हे जाणून घेण्यासाठी वाचा....!
6 मिनिटांची अंगावर शहारे आणणारी रोचक भयकथा...!

योगेश जोजारे लिखित कथा "कुठे जायचंय साहेब...?" मातृभारती वर विनामूल्य वाचा
https://www.matrubharti.com/book/19884289/kuthe-jaaychany-saheb

Marathi Story by योगेश जोजारे : 111458825
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now