।। सेवानिवृत्ती ।।
शासकीय कर्मचाऱ्यांच्या जीवनात
एक दिवस येतच असते सेवानिवृत्ती
बरीच वर्षे येथे काम केल्यानंतर
येथून सुरू जीवनाची दुसरी आवृत्ती
रोज सकाळी सकाळी उठायची घाई
दुपारचा डबा आपली वाटच पाही
सायंकाळी थकून भागून घरी येई
हे सर्व आता कायमचेच बंद होई
वेळ देता येईल आपल्या कुटुंबाला
भेटता येईल आपल्या नातलगाला
करायचे शिल्लक आहेत काम काही
जवळ वेळ भरपूर निपटारा करायला
घड्याळातील तीन काट्याप्रमाणे
एका मागे एक आत्ता पळायचे नाही
सेवानिवृत्तीने स्वातंत्र्य मिळालंय आता
कोणाच्याही बंधनात राहायचे नाही
- नासा येवतीकर, 9423625769
सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचारी बांधवांना यानिमित्ताने आपणांस मनःपूर्वक शुभेच्छा .....!