Marathi Quote in Poem by Na Sa Yeotikar

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

#घरटे
काडी काडी गोळा करून
चिमणी तयार करते घरटे
नसतात कोणी मदतीला
बिचारे काम करते एकटे

पिलांच्या सुरक्षिततेसाठी
बनविते सुंदर असे घरटे
छान बिछाना तयार करते
घेऊन अनेक काटेकुटे

दिवसरात्र चालू असते त्यांचा
घरटे बनविण्याचा आटापिटा
लांब लांव काडे येती कामाला
त्यांना वाटते ते घराच्या विटा

प्रत्येकजण घेतो काळजी
जन्माला येणाऱ्या बाळाची
पशु-पक्षी-प्राणी असो कोणी
उत्सुकता नवजात शिशूची

Marathi Poem by Na Sa Yeotikar : 111452652
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now