*सण - उत्सव*
उत्सव येतात
हे घराघरात
आनंद मनात
प्रत्येकांच्या ।। १ ।।
सगे नातलग
सखा जीवलग
भेटती सलग
निमित्ताने ।। २ ।।
गोड धोड खाणे
ड्रेस नवा घेणे
शुभेच्छा ही देणे
एकमेकां ।। ३ ।।
अशी सण येती
सर्वां मोद देती
अवती भवती
प्रसन्नता ।। ४ ।।
सणांचा सोहळा
प्रत्येकी वेगळा
आनंदाचा मेळा
मनोमनी ।। ५ ।।
लहान सहान
सर्वाना समान
मिळतो सन्मान
सणासुदी ।। ६ ।।
विविध धर्मात
सण उत्साहात
साजरी होतात
घरोघरी ।। ७ ।।
- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769