आठवणीने जिच्या व्याकुळ मी होतो ती तू
दिसताच समोर आनंदून मी जातो ती तू ।
आयुष्यात येणारे सुखाचे क्षण तू
दुःखात मिळालेला सोबतीचा हात तू ।
रिमझिम पावसात भिजण्याचा आनंद तू
थंडीत मिळणारी मायेची ऊब तू ।
माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवटही तू
दिवसाच्या प्रत्येक आठवणीत तू ।
हृदयाची beat तू, घेतलेला श्वास तू
Life मध्ये दिलेली देवाची सुंदर भेट तू ।
पाहिलेल्या स्वप्नातील माझी cute शी परी तू
प्रेमात वेडावलेल्या तुझ्या राजाची राणी तू ।
जीवनात येणारा प्रत्येक आनंद तू
तू एक मैत्रीण, प्रियसी आणि बायकोच नाहीस
माझ्यासाठी माझं सुंदर जग तू ।
#Enjoy