Marathi Quote in Poem by Kajol Shiralkar

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

#काव्योत्सव विषय -प्रेम

तू माझा सखा

तुला पाहिले आणि बावरले मी
आरशात हजारदा गुंतले तुझ्यात मी..

समोर तू असताना मी विसरले मला
कसलीही तळमळ खेची तुजजवळ मला...

सखा राधेचा जसा कमलनयनी
तशी झाले दिवाणी मी मनमोहिनी ...

लागली तुझी ओढ , तुझा छंद
जसा भुंगा घुटमळी जिथे मकरंद..

आयुष्य तुझ्या नावे कधी झाले मला ना कळले
स्वच्छंदी मन माझे तुझ्या भेटीसाठी आतुरले...

जीव जडला जणू जन्मजन्मांतरीचा
तूच आहेस माझा तुकडा काळजाचा....

तुझ्या प्रितीसवे जगाशी लढेन आता जरी
तुझी नाळ माझ्यासवे अखेरच्या श्वासापरी...

--©काजोल मधुकर नम्रता शिराळकर

Marathi Poem by Kajol Shiralkar : 111160680
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now