व्यक्त प्रेम...!!
मनाच्या अंतरंगात भावनेचे विविध तरंग अथवा आपण त्याला भावनेचे फवारे म्हणू हवं तर , जसजसं आपल आयुष्य उलगडत जातं जीवन एक - एक वळण घेत जात,मनातल्या भावना हिंदोळ्यावर झोके घ्यायला लागतात . खरतर माणूस हा भावनेच्या अधीन आहे असं म्हणायला हरकत नाही कारण भावना मानवाला नियंत्रित करत असल्यासारखं जाणवते की माणूस जस वागतो त्या नुसार भावना मनात दाटतात हा खरच संशोधनाचा विषय होऊ शकतो पण आपण त्यावर नंतर कधी बोलू ,
माणसाची पौगांडवस्था ही प्रेम भावनेला पोषक असलेली अवस्था आहे.प्रेमाचे बीज अंकुरित होऊन प्रेम फुलायला पोषक अशा भावना मनाला घिरट्या घालतात.आणि प्रत्येक मन प्रेमाची त्याच्या सोयीनुसार व्याख्या करायला लागत प्रेमाची भावना जरी प्रत्येकाच्या मनात सारखी असली तरी प्रेमाचा प्रेमाबद्दल चा दृष्टीकोन हा प्रत्येकाचा सारखाच असेल असं नाही .स्वतःला केंद्रबिंदू ठेऊन माणूस आपल्या गरजेनुसार किंवा आपल्या सोयीनुसार प्रेम हे स्वतःला समजावत असतं .अमर्याद असलेलं प्रेम माणूस भावनेत गुंताऊन त्याला मर्यादा घालून देत .खर तर इथेच आपण चुकतो .अमर्याद अश्या समुद्राला जर आपण एका चौकटीत ठेवलं तर त्याच सौदर्य नाहीस होऊन जाईल ,प्रेमाचं पण असच आहे जर आपण त्याला भावनेत बांधायचा प्रयत्न केला किंवा त्या भावनेला एका चौकटीत ठेवायचा प्रयत्न केला तर प्रेमाचं मूळ अस्तित्वच नाहीस होऊन जाईल .आणि तसच होत आहे आज , खर तर प्रेम ही डांबून ठेवण्यासाठी नाहीच ते उधळत राहावं लागत ते ओसंडून वाहू द्यावं लागत. प्रेम हे असच आहे जेवढं तुम्ही द्याल त्याहून जास्त तुमच्या जवळ ते परत येईल.
प्रेमाचं सौदर्य पुढील भागात समजाऊन घेऊ .....
परोक्ष जाणिवेचा रंग प्रेमाचा
अकल्पित सौंदर्याचा गंध प्रेमाचा
व्यक्त अव्यक्त भावनेचा संग प्रेमाचा
. चंचल मनात बांधला बंध प्रेमाचा