#Kavyotsav
भावना....
कोकणातल्या नारळाची हिरवळ,
सागरी किनाऱ्यावर लाटांची धडकन...
फणस-काजुच्या रसागरासारखा,
तु माझ्या आयुष्यात आलास.....
धगधगत्या उन्हात आलेली
पावसाची श्रावणसर,
त्यातच मंद मृद्गंधाची भर...
शरदातल्या चंद्रकोरीच्या शीतल प्रकाशासारखा,
मला तू सुखावून गेलास....
तुझं प्रेम म्हणजे सुख,
तुझं प्रेम म्हणजे समृद्धी,
तुझं प्रेम म्हणजे सर्वस्व,
तुझं प्रेम म्हणजे आयुर्वृदधी...
पण,
तुझ्याच प्रेमात आयुष्याची उद्ध्वस्ती...
भासलं होतं,
तुझं प्रेम म्हणजे
वाळवंटातली हिरवळ....
निट बघितलं तर कळलं,
तुझं प्रेम म्हणजे नुसतंच
त्याच वाळवंटातलं एक मृगजळ....
आयुष्यात येतांना तु आणलेलं सुख,
जातांना परत घेऊन गेलास....
आणि मला तिथेच स्तब्ध उभं ठेऊन गेलास....
अगदीच महासागरात जमलेल्या बर्फासारखा.....
आता ना तुझ्या येण्याची वाट आहे ना प्रेमाची आस.....
मी आजही स्तब्ध आहे,
निर्भाव मन अन् निर्मन शरीरासह....
तिथेच, तशीच..
ओसाड-उजाड कोरडवाहू जमिनीसारखी....