# kavyotsav 3
विषय : नाते
शेवटचे श्वास
दवाखान्यात सूरू असलेल्या श्वासांना
कुठे कळतात
जी.आर. जगण्याचे
अमूक अमूक तारखांचे
कुठे कुरवाळावे लागतात त्यांना
सर्क्यूलर आयूष्याचे
नकोच असते त्यांना कन्सेशन
नात्यांकडून
पण लेटमार्कही नको असतो
तिष्ठत बसलेल्या नजरांकडून
डोळ्यातले अश्रू करत असतात
होता होईल तेवढी क्षमेची रीकव्हरी.....
हुकलेल्या संधींनी कापून घेतलेला टॅक्स
मेंदू मांडत राहतो मनात
पण
आजवर ग्रेडपेच्या जोरावर
उड्या मारणार्या श्वासांना
सरतेशेवटी कळू लागत
गरजांच बेसीक...
सर्विसबुकातले माहीत नाही
पण काॅन्फीडेन्शीयल रीपोर्टमधले
सगळे लाल शेरे आठवत राहतात
त्या श्वासांना
आणि आत्तापर्यंत नाॅट आऊट असलेल्या त्यांना
घाई झालेली असते
या दुनीयेतून
बायलाॅजीकली आऊट होण्याची.....
..........................................................
प्राजक्ता प्रविण बिरारी
बोरीवली
पत्ता :रूम न 18 प्लाॅट न 56
बेस्ट आॅफीसर क्वाॅर्टर्स
गोराई खाडी बोरीवली (पश्चिम)
मुंबई 93