हॅश टॅग #Kavyotsav
१) विषय -मित्र
नात्यातला नसला तरी वाटतो तो आपला
प्रेमाचा ओलावा त्यानेच तर जपला
नात्यात कधीतरी वैरातून दुरावा येईल
तो जेवढा दूर, तेवढी ओढ लागेल
त्याने केलेल्या खोड्याही रंगतदार असतात
थकलेल्या मनाला नवी उभारी देतात
तो कधी सारथी, कधी नावाडी होतो
संकटांच्या सागराना परतवून लावतो
शब्दांनी कळणार नाही त्याची किंमत
असताना सोबत अरेरावीची कुणाची नाही हिंमत
जात, धर्म, भाषा , देश या पलीकडे हे नाते
निर्मळ असे प्रेम त्यातून वाहते
त्याची सर कुणाला येणार नाही
ऋण काही केल्या फिटणार नाही
२) कविता-प्रेम
प्रेम दिसत नसते
काळजात लपत नसते
त्याची परीक्षा नसते
ते निरंतर वाहत असते
प्रेमाला शब्दांची नसे भाषा
दाखवी उत्तुंग आशा
ती धुंद करणारी नशा
निरंतर तरुणाईची दशा
नाही त्याला बंधन
देवाघरचे ते चंदन
झिजून गेलेले सहाण
तरी भागत नाही तहान
प्रेम असे क्षणिक आग
काळजाला लावी धग
प्रेमाने जिंकते जग
त्यावरच सृष्टीचा तग