विषय - प्रेम, भावना
शीर्षक - विसरू शकेन मी?
डोळे खट्याळ
हसणे मधाळ,
मोहक तो शृंगार
विसरू शकेन का मी ?...
निसटलेला हात
वळवलेली पाठ,
तुझे पुन्हा न येणे
विसरू शकेन का मी ?...
बेधुंद ते नाचणे
विनाकारण रुसणे ,
निष्पाप तुझी लबाडी
विसरू शकेन का मी ?...
खोट्या शब्दांना
प्रेमाहून मोठ्या स्वप्नांना,
फसव्या वचनांना
विसरू शकेन का मी ?...
मंजूर नाही मनास
अस्तित्व तुझे खोटे,
सर्वत्र तुझ्या शोधात
आयुष्य वेचिन का मी ?...
- अमेय जोशी
#Kavyotsav