बी.एड्. फिजीकल

(15)
  • 20.1k
  • 0
  • 8.4k

ती तारीख होती बुधवार दि. २७ एप्रिल ७७! कांदिवली गव्हर्नमेण्ट कॉलेजच्या बी.एड्. फिजीकल कोर्ससाठी प्रवेश अर्जा सोबतजोडायला सिव्हिल सर्जनचं फिटनेस सर्टिफिकेट घ्यायला मी मुणग्यातून सकाळच्या देवगड गाडीने रत्नागिरीला जायला निघालो होतो. आदल्या दिवशी गोरेगावच्या निळूभाऊ गोखल्यांचं टपाल आलं. त्यातून तो प्रवेश अर्ज आलेला होता. अर्ज पाठवायची अंतीम तारीख होती ३० एप्रिल. मी साधले क्लार्कनाअर्ज दाखवला. त्यानी छापिल प्रवेश अर्जावर थेट माहिती न भरता कोरा फुलस्केप घेवून त्यावर माहिती भरून घेतली. अर्जास

1

बी.एड्. फिजीकल - 1

बी.एड्. फिजीकल भाग 1 तीतारीख होती बुधवार दि. २७ एप्रिल ७७! कांदिवली गव्हर्नमेण्ट कॉलेजच्या बी.एड्. फिजीकल कोर्ससाठी प्रवेश सोबतजोडायला सिव्हिल सर्जनचं फिटनेस सर्टिफिकेट घ्यायला मी मुणग्यातून सकाळच्या देवगड गाडीने रत्नागिरीला जायला निघालो होतो. आदल्या दिवशी गोरेगावच्या निळूभाऊ गोखल्यांचं टपाल आलं.त्यातून तो प्रवेश अर्ज आलेला होता. अर्ज पाठवायची अंतीम तारीख होती ३० एप्रिल. मी साधले क्लार्कनाअर्ज दाखवला. त्यानी छापिल प्रवेश अर्जावर थेट माहिती न भरता कोरा फुलस्केप घेवून त्यावरमाहिती भरून घेतली. अर्जासोबत शालेय व महाविद्यालयीन काळात जिल्हा/ राज्यस्तरावर खेळांमध्ये वैयक्तिक किंवा सांघिक सहभाग, मैदानी क्रीडा प्रकारांमध्ये मिळवलेली नैपुण्य पदकं, प्रशस्तीपत्रं जोडायची होती. मी शालेय ...Read More

2

बी.एड्. फिजीकल - 2

बी. एड्. फिजीकल भाग 2 दोन मुलाना एक खोली मिळे. खोलीत दोन कॉट,दोन टेबलं नी खुर्च्या मिळत. आंघोळीसाठी २५बाथरूम्स २५ संडासहोते. मोठ्या कॉन्क्रिटच्या टाक्या होत्या नी २४ तास पाणी मिळायचे. प्रत्येकाने आपला बेड बेडिंग, डास खूप असल्यामुळे मच्छरदाणी व बादली तांब्या भांडेन्यायचे होते. दुसरे दिवशी सामानाची जमकरून शुक्रवारी ११ वाजता सामान खोलीत टाकून मी लेक्चर हॉलमध्ये प्रवेश केला. प्रा.सानप मॅडम रोलकॉल घेत होत्या. मी परवानगी विचारून वर्गात प्रवेश करताच मला भेदक नजरेने न्याहाळून मॅडम बोलल्या, “तुमचं नाव काय? तुम्ही कुठून आलात?क्वालिफिकेशन काय?”मी म्हणालो , “ श्रीराम विनायक काळे.मी कोकणातून, आयमीन देवगड तालुक्यातूनआलो.१९ ७६मध्ये ...Read More

3

बी.एड्. फिजीकल - 3

बी. एड्. फिजीकल भाग 3 एकमेकांशी बोलताना काहीजण सहजावारी पण कळवळ्याने म्हणायचे, “ह्ये काळ्या बिचारं हितं काय जगत न्हाय पण दोनचार दिवस गेल्यावर मला त्या रुटीनमध्ये अवघड, जीवघेणं असं कधीही काहीभासलं नाही. पहिल्या टर्ममध्ये सकाळच्या असेंब्लीत १०० जोर नी संध्याकाळी१५० बैठका काढायच्या असत. अर्थात हेआकडे म्हणजे सक्ती नसे. तेवढं न जमणारेवआणखी साताठ महाभाग होते. उलट मांडवे, घाटे, मुच्छड थोरात नी काझी यांच्या सारखे काहीपैलवान गडी हा व्यायाम कमी पडतो म्हणून रोज सकाळी उठून दोनशे जोर नी अडिजशेबैठका मारीत असत. मेस मधलं जेवण म्हणजे मात्र कहर होता.फुलके काही अर्धे कच्चे, काही करपलेले नी कडा ...Read More

4

बी.एड्. फिजीकल - 4

बी. एड्. फिजीकल भाग 4 सुरू आज कुर्मा पुरी, बासुंदी स्पेशल बेत होता. प्राचार्यांसह सर्व स्टाफ आणि कमिटी गेस्ट रूम मध्येलंच घेवून ऑफिसकडे गेले. साडे अकराला लेक्चर्स सुरू झाली. साडेतीनला कमिटी मेंबर्स विजीट पूर्ण करून निघून गेले.प्राचार्य लेक्चर हॉलमध्येआले.कमिटी व्हिजिट मुळे इव्हिनिंग असेंब्ली रद्द केलेली होती. दोन दिवसानी सराव पाठ सुरूव्हायचे होते. दहा ऑक्टोबरला लेसन्सचे सेशन असे पर्यंत दुपारची लेक्चर्स बंद होती त्या ऐवजी रोज रात्री आठ ते अकरा या वेळेत चार लेक्चर्स होणार असा बदलेला कार्यक्रम त्यांनी संगितला. क्लास सुटला नी आम्ही आनंदात रूमवर निघालो. शिंदे मास्तरची खबर ...Read More

5

बी.एड्. फिजीकल - 5

बी. एड्. फिजीकल भाग 5 आम्ही टॅक्सी करून निघालो. वाटेत भेळवाल्यांच्या गाड्या दिसल्यातिथे थांबलो. प्रचंड भूक लागलेली होती. आम्ही पॅटिस खाल्लं. कुल्फी खाल्ली तेव्हाजरा पोटाला आधार लागला. आम्ही पाच जिने चढूनराजाच्या बिऱ्हाडी गेलो. चार पाच वेळा बेलमारल्यावर दार उघडलं. आठ बाय सहा फ़ूट बंदिस्तव्हरांड्यात सोफा नी नी स्टुल ठेवलेलंहोतं. आम्ही सोफ्यावर बसलो. शर्ट काढून आत जाता जाता राजा त्याच्या बायकोला म्हणाला, “याना पाण्याचा तांब्या भांडं आणून दे. तिने दोन मिनिटात तांब्या भांड आणूनस्टुलावर ठेवलं नी धाड्कन दार लावून आतून कडीघालून घेतली. राजा आमची झोपायची काहीतरी सोय लावील म्हणूनआम्ही तासभर वाट बघितली. ...Read More

6

बी.एड्. फिजीकल - 6

बी. एड्. फिजीकल भाग 6 हात जोडीत तात्या म्हणाला,“हितंच भेटलात तेबरं ... वर आणि घेटू नका..... माझ्या बापजाद्यान हा केलेला नाही.” उद्या कमी पडलेलामाल जावून घेवून या नाहीतर बीलं तरी बदलून आणा.” फडणीस वहीत यादी उतरून घेत होता.“ बागुल म्हणाला, “खराड्या,ह्यो बामन लई येड्याबोड्याचा हाय की....आमाला कामाला लावलं की.वही मिटून घेत फडणीसरागाने म्हणाला,“ काय बोललास रे बागूल? आं.... आधी माफी माग.” बागूल भलताच निबर होता,“आता मापी आनी कस्या बद्दल?” मग न राहवून चावरेकर म्हणाला,“कसली घान शिवी दिलाईस येड्यातू.... चुकलो म्हन नी हो मोकळा.....” त्यावर अधिकच चिडून बागुल बोलला,“ लई शाना हाईस ...Read More

7

बी.एड्. फिजीकल - 7

बी.एड्. फिजीकल कांदिवली 7 ती वाक्यं फळ्यावरलिहिली. तीन चार मुलांकडून वाचून घेतली. माझा पाठ सुरू असताना प्रशालेचे सुपरवायझर फेरी गेले. मग पाठ वाचला सोपे सोपे प्रश्न विचारले. शब्द नी वाक्यं मी न सांगताच मुलानी वहीत लिहूनघेतली. मग मुलांकडून पाठ वाचून घेतला. यात ३०मिनीटं होवून गेली नी घंटा झाली. मी धड्या खालचा स्वाध्याय घरी पूर्ण करायचा गृहपाठ देवून वर्गा बाहेर पडलो. कुलकर्णी सरानी माझी पाठ थोपटली. कांदिवलीत परत जाताना बिटला म्हणाला, “आमी तुला ऐरा गैरा समजलो हुतो. काल रातीला तुज्याकड आलो आसतो तर माजा पाठ पडला नसता. ह्ये लेसनचं ...Read More

8

बी.एड्. फिजीकल - 8

बी. एड्. फिजीकल भाग 8मुलींपैकी विनोदबाला, कुंदन , सुषमा , मोहिनी, चित्रे, मोने, वळवईकर, ज्युलिया या मुली मला छोटे म्हणत. त्याही आमच्या रूमवर लेसनचीचर्चा करायला येत. त्यांना लागणारी चित्रं काढून द्यायला मला हक्काने गळ घालीत. काहीवेळा रात्री दीड दोन वाजेपर्यंत जागून मला काम पुरं करावं लागे. मग सकाळी मला उठवतानाचावरेकर माझी कानउघाडणी करी. माझ्याकडे चित्र काढून मागायला कूणी आला तर त्यालाही सुनावीतअसे. गणेश चतुर्थी नंतरचा दुसरा गुरुवार होता. बोरीवलीचे लेसन उरकल्यावर मी परस्पर मालाडला जात होतो . मालाड स्तेशनला उतरल्या पश्चिमेला स्टेशन पासून दोनेक मिनीटाच्या अंतरावर एस्. व्ही .रोड लागे. तो ...Read More

9

बी.एड्. फिजीकल - 9

बी. एड्. फिजीकल भाग 9 तो माणूसफार घमेण्डखोर नी उर्मट होता. माझी कॉलर धरून धमकावीत ते बोलले, “काय रे काय समजलास रे तू? तुझी औकात काय?” आता मात्र माझा संयम सुटला त्यांचा हात झिंजाडून बाजुला होत मी चिडून म्हणालो, “तुम्हीमोठे अहात, तुमचा आदर ठेवूनच मी बोलतोय्.... पन तुम्ही मला गुंडा सारखंवागवलत. मी काही ऐरा गैरा नाही. रत्नागिरीचे शिक्षक आमदार ज.ग.भावे यांचा मी विद्यार्थी आहे. माझी काहीही चूक नसताना तुम्ही माझा बाप काढलात, औकात काढलीत....मीआमदार भावेसरांकडे न्याय मागेन. त्या आधी मी ही गोष्ट प्राचार्यांच्या कानावर घालतो.”आता मात्र सरांच्या पाया खालची वाळू सरकली.त्यांचा चेहेरा पडला. आमच्या ...Read More

10

बी.एड्. फिजीकल - 10

बी.एड्.फिजीकल कॉलेज,कांदिवली भाग१०त्यावेळचे पतियाळाचे प्रख्यात कोच डॉ.डिक्रूझ हाफ स्टेपजंप आणखी डिस्कस थ्रो (थाळी)चं कोचिंग द्यायलाआठवडाभर आलेले होते.हाय जम्पचं ट्रेनिंग ‘ते’ सर म्हणाले, "काळे,तुम् लक्ष देवून वेस्टर्न रोल स्टाईलची प्रॅक्टिस करा.तुम्हाला नक्की जमेल. त्यानी खास प्रॅक्टिस देवून मलावेस्टर्न रोल स्टाईल शिकवली. या इव्हेण्टमध्ये स्टार्टिंग पॉईण्टआणि जम्प घ्यायचा स्पॉट अ‍ॅक्यु‍रेट ठरवावा लागतो हे प्रॅक्टिसकरताना मला नव्यानेच कळलं होतं. सुरुवातीला मी उडी मारण्यासाठी टेकॉफ घेतला कीबार क्रॉसिंगच्या एक्झॅक्ट मोमेंटला सरमाझ्या पोटाखाली हाताचा सपोर्ट देवून लिफ़्टअप करीत . तीन-चार वेळेला असं झाल्यावर मीच सराना म्हटलं,“ सर आता या खेपेला माझा मी ट्राय करतो.तुम्ही सपोर्ट नका देवू.” तरीही सर जय्यत तयारीत राहिलेले होते. त्यामुळे ...Read More

11

बी.एड्. फिजीकल - 11

बी.एड्.फिजीकल कॉलेज, कांदिवली भाग ११या शिंदें प्यूनची एक मजा होती. ते जेमतेम सही पुरते शिकलेले. पण सरावा सरावाने फाड इंग्रजी पाजळून दाखवीत. “ सुपेकर सुप्रिटेण्ड क्वॉलिंग यू प्रभू अ‍ॅण्ड काळे सर. कोन्सुलेट लेटर यू टेक. गो व्हिटी स्टेशण निअर ब्रिंगिंग पिक्चर फिलिम फ्रेंच कान्स्युलेट.” असा प्रकार होता. पण बोले असा काही धडकावून की इंग्रजी न येणारा सर्द व्हायचा. प्रभू त्याला त्याच भाषेत, “ यस यस मिष्टर शिंदे गोईंग सुपेकर साहेब अ‍ॅण्ड टेकींग लेटर. ” असेंब्लीचं रेकॉर्ड शिंदे सर ठेवीत. त्याना ते पत्र दाखवलं की ते त्यांच्या डायरीत लिहून ठेवीत. आम्ही व्हीटीला जावून मॅटिनीला ...Read More

12

बी.एड्. फिजीकल - 12

बी.एड्.फिजीकल कॉलेज, कांदिवली भाग १२पण आदल्या दिवशी एकत्र बसून गीताच्या कोणत्या ओळीला कोणती कृती करायची तेवढं ठरवलं होतं. सादरीकरणाचा लीडर मी होतो. पण कृती माझ्या एकट्याच्या चिंतनातून सुचलेल्या नव्हत्या. सामूहीक चिंतन हे आमच्या यशा मागचं खरं रहस्य होतं. तीन वेगवेगळ्या प्रकारे धावणं टी.बी पाटील ने करून दाखवलं होतं. चवड्यावर उभं राहून हात उंचावून झाडं कशी डोलतात हे ग्रूप लिडर डुंबरेने दाखवलं होतं.सशाच्या टाण् टाण् उड्या चावरेकरने दाखवल्या होत्या. सर्कशीत सशाने मारलेली कार्ट व्हील नी कोलांटी उडी ही अनभुलेची सुचना होती. गीत फक्त मी निवडलं होतं आणि सादरीकरणात माझं शहाणपण न गाजवता सर्वानी केलेल्या सुचनांचं कसोसीने पालन केलं. तुला खरं ...Read More

13

बी.एड्. फिजीकल - 13

बी. एड्. फिजीकल भाग १३ मंजू ओरपेची आई तर शनिवारी मी येणार का याची चौकशी करीत असायची. निळू भाऊंकडे पण ओरप्यांकडेच माझा मुक्काम असायचा. तिथेच बाजूच्या खरे काकांचा मुलगासुजीतही दहावीला जाणारा. त्याच्या आईला कळल्यावर मग सुजीतही यायला लागला. आमचे सरावपाठ सुरू झाल्यानंतरची गोष्ट. पाठ वेळेत पूर्ण व्हावा म्हणून मी प्रभू , चावरेकर यानासांगून ठेवलेलं असे. ते पाठ संपायला पाच मिनिटं उरली की मला खूण करीत, की मग मी उपयोजनपायरी सुरू करून वेळेत पाठ पुरा करी. खरे काका नी ओरपे यांच्याशी गप्पा मारताना लेसन घेतानाचीही गोष्ट गंमतीचा भाग म्हणून सांगितली. त्याबरोबर ‘आलो हं ...Read More