Memories of B.Ed. Physical - 3 in Marathi Moral Stories by Prof Shriram V Kale books and stories PDF | बी.एड्. फिजीकल - 3

Featured Books
Categories
Share

बी.एड्. फिजीकल - 3

          बी. एड्. फिजीकल  भाग 3           

एकमेकांशी बोलताना काहीजण सहजावारी पण कळवळ्याने म्हणायचे, “ह्ये काळ्या बिचारं हितं काय जगत न्हाय गड्या.....” पण दोनचार दिवस गेल्यावर  मला त्या रुटीनमध्ये  अवघड, जीवघेणं असं  कधीही काही भासलं नाही. पहिल्या टर्ममध्ये  सकाळच्या असेंब्लीत १०० जोर  नी  संध्याकाळी १५० बैठका काढायच्या असत. अर्थात हेआकडे म्हणजे सक्ती नसे.  तेवढं  न जमणारेवआणखी साताठ महाभाग होते.  उलट मांडवे, घाटे, मुच्छड थोरात नी काझी यांच्या सारखे  काहीपैलवान गडी  हा व्यायाम कमी  पडतो म्हणून रोज सकाळी उठून दोनशे जोर नी अडिजशेबैठका मारीत असत. 

             मेस मधलं जेवण म्हणजे मात्र कहर होता.फुलके काही अर्धे कच्चे, काही करपलेले  नी कडा जाड असत. आम्ही  काहीजण फुलक्यांच्या कडा कुरतडून टाकून चारपाच फुलके खातअसू. प्रभू  शिकस्त सहाफुलके खाई. पण सांगली. सातारा, नगर, वर्धा, नागपुर भागातले  काहीजण वेळेला ३०/३५ फुलके  खात.असा बळकट आहार असणारे  निम्म्याहून अधिक लोक  होते.  त्यातले काही जण  फुलके फाडून - कुस्करून त्यावर आमटी नी उसळ- भाजी ओतून रेडे म्हशी आंबोण खातात तसा हपॉक चपॉक आवाज काढीत खात. अशा लोकांच्या बाजुला बसूनजेवणंही नको वाटायचं. राऊळ  याबाबतीत  भलताच निर्भिड....असाकोणी काला खाणारा चुकून माकुन बाजुला बसायला आलाच तर तो सरळ सांगाकचा. “ह्यां बग मेढे/मांडवे तू  फुलके कुस्करून आंबवाण कसो कालोकरून खाणार मां? तू काय नी कसाव खा पण हंय माज्या कडनीक नुको बसू .... माका अन्न जावचा नाय नी तुज्या डोक्यार पाप येयत्. तां बग तिकडे स्टूल रिक्यामा  हा.....बाबामाजो  तो ...जा.... जा बाबा थंय बस जा.....”राऊळ असं काही अजिजीने  सांगे   की ऐकणारा बापडा खजिल होवून बाजुला जाई.

        अडमिशन फुल झाल्या नी सर्वाना  युनिफॉर्म च्या इंक ब्ल्यू  रंगाच्या दोन शॉर्ट , दोन जांगे नी दोन गोल  गळ्याच्या जाडसर बनियान घ्यायचं कंत्राट  देण्यासाठी जी.एस.नी यु.आर. यांची निवड करण्यासाठी जनरल मिटींग झाली. सांगली,सातारा,नगर,पुणे  हा एक गट आणि नागपूर,वर्धा , औरंगाबाद, जालना दुसरा गट असे  दोनतट  पडले. सांगली सातारा गटातल्यांची संख्याजादा  म्हणून मुच्छड थोरात नी देशमुख हे जिंकले.त्यानी युनिफॉर्मची ऑर्डर दिली. त्यात भरपूर कमिशन काढलं. नोटिस बोर्डावर बिलं लागल्यावर मुंबईतले माहितगार प्रभु, जोगेश्वरीचा ओक, आबा चौधरी, हे सांगायला लागले  की, प्रत्येक नगामागे यानी  पंधरा ते वीस रुपये अधिकचे लावलेले आहेत. ही बोंब मारणारे आम्ही दहा पंधरा लोक..... हिशोबाला मान्यता द्यायची मिटींग  झाली त्या दिवशी दुसऱ्या नागपूर -जालना गटातले  लोक आयत्या वेळी फुटले. चौधरी नी ओक ह्यानी बिन्नीचंसुटिंग नी टीशर्ट ची सॅम्पल आणि बिलंहीआणलेली होती. नामांकित टेलर्सकडून शिलाईची कोटेशन्सआणलेली होती. त्यानी जाहीर आरोप केले पण प्रश्न मताला  पडल्यावर बहुमत विरोधकाना मिळालं  नी कमिटीचा भ्रष्टाचार खपून गेला. त्या रात्री  नेमका  फिस्ट्चा दिवस होता. मांसाहारींसाठी मटण नी शाकाहारींसाठी श्रीखण्ड पुरी चा बेत होता. राजरोसपणे होस्टेलवर दारू पार्टी  झाली.नी  बहुसंख्य पोरं पिऊन टाईट झालेली होती.

       हाऊस फॉर्मेशन झाल्यावर आठवडाभराने रूम इन्स्पेक्शन  झालं. प्राचार्य खासनीस  दहा वाजता आले. त्यानी सर्व रुम्स फिरून पाहिल्याआणि सर्वाना मेसमध्ये एकत्र जमविलं. लेडिज सेक्शन मध्ये   शर्मा आणि शहा यांच्या रुमला आणि जेण्टस सेक्शनमध्ये  चावरेकर आणि माझी रुम याना प्रथम क्रमांक मिळाला. रिझल्ट डिक्लेअर  आमची रूम पहायला  सगळ्यानी गर्दी केली. रुम ताब्यात घेतल्यावर मागचा पुढचा व्हराण्डा रोज लख्ख झाडून बादलीभरपाणी ओतून फरशी  धुण्याचा  प्रघात मी सुरू केला. चावरेकरलाही स्वच्छतेची  आवड. मी न सांगता दुसरे दिवशी त्याने केर काढूनफरशी धुतली. तेव्हा पासून आम्ही आळीपाळीने हे काम करत असू. मागच्या बाजूच्या खिडकीत मी गणपतीची फोटो ठेवला होता. त्यासमोर डिशमध्ये रोज दुवक्त तेलाचं निरांजन  लावून  अगरबत्ती लावली जायची.

         कॉटवरचं बेडशीट एकही सुरकुती न पडू देता  नीट खोचलेलं असायचं. मच्छरदाणी व्यवस्थित गुंडाळी करून दोन्ही बाजुना नाटकाच्या पडद्या सारखी बांधलेली असायची. स्पोर्टस् शूज आणि साध्याचप्पल्स कॉट खाली  नीट  ठेवलेल्या असत. माझ्या प्रत्येक व्यवस्थित टपणाच्या कृतीचं अनुकरण चावरेकर मनापासून करायचा.तोसगळ्याना नेहमी  अगदी अभिमानाने सांगायचा.“येवस्थित, स्वच्छ कस ऱ्हायाचं ह्ये मी काळ्या कडून शिकलो...” आमच्या खोलीत आल्यावरप्रसन्न वाटतं असं येणारा प्रत्येक जण म्हणायचा. हळू हळू आमच्या शेजारच्या रूम मधले अनभुले, बिटला, मुंढे, कुंटे, जाधव , पाटील, हाऊस लीडर डुंबरे एवढंच नव्हे  तर जिमजवळच्या दुसऱ्या  हॉस्टेल मधले फडणीस, देवधर, ओक , धडस  रोज सकाळी आंघोळ  करून आल्यावर आमच्या खोलीत येवून गणपतीच्या पाया पडून जायचा रोजचा शिरस्ता झाला. त्या वर्षभरात दहा वेळा वेगवेग़ळ्या स्टाफ मेंबर्सनी हाऊस इन्स्पेक्शन केल . पण दरवेळी  आमच्याच रूमला पहिला नंबर मिळाला.  

        सप्टेम्बर मध्ये मुंबई विद्यापीठाच्या स्टॅण्डिंग कमिटीची विजिट व्हायची होती. महाविद्यालयाचं कामकाज निर्धारित तत्वांप्रमाणे सूरू आहे की नाही याची दर तीन वर्षानी पहाणी करून महाविद्यालयाची मान्यता  सुरू ठेवायची की नाही याची शिफारस  ही कमिटी करीत असल्यामुळे सगळा स्टाफ कसून तयारीला लागला. इमारतींना रंगरंगोटी, दुरुस्ती सुरू झाली. तसेच  महाविद्यायातील दैनंदिन अभ्यासक्रम विषयक कामकाजाची झलक दिसेल असे एक तासाचे प्रात्यक्षिक सादर करायचे होते. त्यात लेझिम, डंबेल्स, करेल,घुंगूर काठी, पामेल हॉर्स- बॅलंसिंग बीम एक्झरसाईझ, साधा मल्लखांब आणि वेत्र मल्लखांब,फ्लोअर रेसलिंग,  जिम्नस्टिक फ्लोअर अक्टस्असे भरगच्च  आयटम्स  सादर करायचे होते. यासाठी गटनिहाय सराव सुरू झाला.या गोष्टी आमच्या अंगवळणी पडलेल्या असल्यामुळे तीन चार वेळा सराव केल्यावर  फिजीकल डेमो बिनचूक व्हायला लागलं. मग या सर्वांचा क्रम ठरवून  कमिटी येईपर्यंत  रोज सराव सुरू होता.

         कमिटी व्हिजिटचा दिवस उजाडला. त्या दिवशी सकाळच्या असेंब्लित फक्त एक तासभार  फिजीकल डेमोचा सराव घेवून आम्हाला सोडून दिलं.  कमिटी  हॉस्तेल विजिट करणार असल्यामुळे आम्ही परिसर आणि रूम ची साफसफाई  केली. नऊ वाजता कमिटी आली.त्यानी प्रथम मेसला विजिट दिली. मग दोन्ही बॉईज होस्टेल नी क्लिनिकची पहाणे करून ते लेडिज हॉस्टेल विजिट करायला गेले.दहा वाजता  सगळे स्टुडन्टस्  जिम मध्ये जमले. मेसमध्ये चहा फराळ करून साडे दहालाकमिटी मेंबर्स आणि सगळे प्राध्यापक  जिममध्ये येवून स्थानापन्न झाले. प्राचार्यानी व्हिसल वाजवल्याबरोबर डेमो सुरू झाला. प्रा. कांग़णे,प्रा. शिंदे, प्रा.कुलकर्णी,  प्रा. मिसेस सबनीस डेमे सादर करणाऱ्या ग्रूप जवळ थांबलेले  होते.एका वेळी  दो- तीन आयटम्स सुरू होते. लेझिम,घुंगूर काठी ,मुठिया , असे नियोजीत क्रमाप्रमाणे सादरी करण सुरू  होते.  आता पामेल हॉर्स जंपिंग, बॅलन्सिन्ग  बीम आणि फ्लोअर एक्झरसाईझ सुरू झाले. पामेल होर्स्वर सिझर जम्प मारताना एक प्रशिक्षणार्थी आम्ही त्याला‘शिंदे मास्तर’म्हणायचो .त्याचं टायमिंग़ चुकलं. त्याचा पाय हॉर्सच्या टॉपवर  थटला नी शिंदे मास्तर पलिकडच्या बाजूला कोसळला. प्रा. कुलकर्णी, प्रा. कांग़णेलगेच पुढे झाले नी ते शिंदे मास्तरला  स्ट्रेचर वर ठेवून बाहेर घेवून गेले.  

       हा अपघात कमिटी मेंबर्सच्या लक्षातही आला नाही.पण डॉ. जोशींसह सर्व स्टाफच्या ही बाब लक्षात आली.  डॉक्टर उठून बाहेर गेले.  शिंदे मास्तरच्या डाव्या  ढोपराचा सांधा डिसलोकेट झाला होता. असह्य वेदना होत होत्या.पण शिंदे मास्तरने दात आवळून 'हूं 'सुद्धा म्हटले नाही. प्राचार्य उठून बाहेर जावून त्यांची खबर घेवून आले.डेमो पुरा झाला. तीनही कमिटी मेंबर्सची भाषण  झाली. ते आमचा डेमो पाहून अक्षरश: मंत्रमुग्ध  झाले होते. प्राचार्यानी आपल्या भाषणात शिंदेला किरकोळ अपघात झालेला आहे त्याला फिजिओथेरपिस्ट कडे नेलेला आहे काही काळजी करण्या सारखेनाही असे सांगित्ल्यावर कमिटी मेंबर्स पुरे चितपट झाले. चेअर पर्सन  डॉ. लुल्ला म्हणाले,“ओ माय गॉड .... ये बडी अचरज की बात है....कमिटी  मेंबर्सको तो कानोकान पताभी नही चला.......इट्स् रिअली अन बिलिव्हेबल्” प्रोग्राम संपला. आम्ही धडाधड धावतमेस गाठली.  

 ( क्रमश: )