बी.एड्.फिजीकल भाग १४
या कॅम्पमध्ये “झटपट वेशभूषा” या नावाची एक स्पर्धा घेतली होती. यात ग्रूपने आपल्या एका स्पर्धकाला तीन मिनिटांच्या अवधित सर्व प्रेक्षकांसमोरच काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषा घालून सजवायचे होतते. व्हिसल झाली आणि सगळे गट आपापल्या स्पर्धकाला सजवायला लागले. तीन मिनिटानी टायमिंग संपलं. यात मेढेकरचा भिकारी, पैलवान चौधरीचाvतीर कामठा घेतलेला वनचर, दुर्गा खराटेची लेडी डॉक्टर,आणि सुषमा शहाची गवळण या चारही जणांच्या वेशभूषा अशा काहीअप्रतीम दिसत होत्या कि, त्यांच्यात सरस निरस ठरविणे जिकीरीचे होते. परिक्षक डॉ. जोशी आणि प्रा.नाईक मॅडमनी चारही स्पर्धकाना पहिला नंबर विभागून जाहीर केला.
स्काऊट कॅम्प वरून आम्ही आलो त्याच्या दुसरे दिवशी सकाळ पासूनच मला फार थकल्यासारखं वाटत होतं. दुपारी लेक्चर्सच्या वेळी मला सणकून ताप भरला म्हणून चावरेकर नी मी रुमवर आलो. हळू हळू थंडी वाजू लागली. दोन पांघरुणं घेवूनही थंडी कमी होईना म्हणून चावरेने आपलं ब्लॅन्केटमाझ्या अंगावर घातलं . मला ग्लानी आली. शरीर वर वर उचलल्या सारख़ं वाटू लागलं. त्यानंतर काय घडलं ते मागाहून चावरेकरने मला सांगितलं . ताप डोक्यात शिरला नी मी मोठ्याने. कण्हायला लागलो. चावरेकर डॉ.जोशीना सांगायला गेला. ते दुपारच्या वेळी डोंगरीत त्यांचं क्लिनिक होतं तिथे प्रॅक्टिसला जात. दरम्याने लेक्चर सुटून मुलं आली. माझं कण्हणं सुरूच होत. प्रभु आला नी त्याने क्लिनिकमध्ये जावून थर्मामीटर आणला. डॉक्टरांच्या घरून बर्फाची पिशवी आणली. मला ३पर्यंत ताप चढला होता. त्याने मग प्राचार्यांच्या घरी जावून डॉक्टराना फोन केला. १५ मिनिटात डॉक्टर आले. माझी अवस्था फार डेंजर होती.
त्या दरम्याने असेंब्लीची वेळ झाली. मला तीन ताप आहे ही बातमी कळल्यावर सगळेच काळजीत पडले. चावरेकर तर रडायलाच लागला होता. मी यातून वाचट नाही अशी त्याला भीती वाटत होती. तो नी प्रभु असेंब्लीला न जाता रूमवर थांबले.अर्ध्या अर्ध्या तासाच्या अंतराने डॉक्टरनी मला तीन इंजेक्शन्स दिली त्यानंतर माझा ताप एक पर्यंत उतरला. माझं कण्हणंही कमी झाल होतं. डॉक्टरनी तीन वेळाखेपा घातल्या. संध्याकाळी असेंब्ली सुटल्यावर सगळी मुलं रुमवर जमली होती. तेंव्हा माझा ताप उतरला होता. मी घामाने न्हाऊन निघालो होतो. डॉक्टरनी स्पंजने घाम टिपायला संगितला.मी अजूनही ग्लानीतच होतो. रात्री मला फक्त पेज द्यायची होती. प्रा. सानप मॅडमच्या क्वार्टरवरून पेज करून घेवून रात्री आठ वाजता विनोदबाला, मोहिनी, चित्रे आल्या त्यावेळी मी जरा सावध झालो होतो. कशीतरी अर्धी वाटी पेज मी प्याली.दहा मिनीटानी प्राचार्य नी डॉक्टर तसेच सगळे प्राध्यापक मला भेटायला आले होते.त्या रात्री प्रभू नी काझी आमच्या रूम वर झोपायला आले होते.दोन दिवसानी मला आराम पडला.नी त्यानंतर नाताळची सुटीही लागली म्हणून मी मालाडला रहायला गेलो.
जानेवारीत इंटर हाऊस कॉम्पीटिशनमधल्या शेवटच्या इंडोएअर गेम्स टेबल टेनिस आणि कॅरम चे राउण्ड सुरूझाले. आमचं हाऊस पहिल्या राउण्डमध्येच भागलं. दुसरे दिवशी जवाहर हाऊसने टेबल टेनिस फायनल मारली. कॅरमची सिंगल सुभाष हाऊसच्या आबा चौधरीने मारली. आता सुभाष आणि जवाहर यांच्यात फायनल व्हायची होती. मधल्या वेळेत मी सगळ्याना सुपेकर सुपरिटेण्डण्टचागेम दाखवायचं ठरवलं. प्रा. कांगणे सरना म्हटलं, “आपले सुपेकर कॅरमचे चॅम्पियन आहेत. तुम्हीही कॅरम खेळता. तुमची नी सुपेकरांची सिंगलठेवूया.” सगळ्या प्राध्यापकानी माझी सुचना उचलून धरली. प्राचार्य म्हणाले, “जरूर जरून ....मी सुद्धा ऐकून आहे पण त्यांचा गेम नाही बघितलेला. आज होवून जाऊदे.” दहा मिनीटात सुपेकर आले. टॉस सरानी जिंकला. पहिल्या दोन टर्न मध्ये त्यानी तीन कॉइन्स काढली. तिसरा टर्न फेल गेला नी स्ट्रायकर सुपेकरांकडे गेला. त्यानी आपल्या स्टाईलने बोर्डकर भरपूर पावडर मारून आंगठा आणि तर्जनीमध्ये स्ट्रायकर पकडून स्टान्स घेतला नी जे सट्ट्यासटक सुरू केलं की,स्तंभित झालेल्या प्रेक्षकाना टाळ्या वाजवणही सुचलं नाही. पाच स्ट्रोक्समध्ये त्यानी बोर्डफिनिश केला . प्राचार्यानी उठून टाळ्या वाजवल्या तेंव्हा सगळे भानावर आले आणि टाळ्या नी चिअर्सचा पाऊस पडला.
पुढचा राऊण्ड त्यानी मारला.दोन सेट सलग जिंकल्या मुळे खरंतर पुढचा राऊण्ड खेळायची गरजच नव्हती. पण सगळ्यानाच त्यांचा गेम पहायचा होता. यावेळी सुपेकरनी पहिला चान्स सराना दिला. सर खिलाडू होते. “मी हरण्यासाठीच खेळणार आहे. पण बोटात वीज असलेल्याकॉम्पीटिटर कडून हरण्यातही मजा आहे.” असं सांगून त्यानी खेळ सुरू केला. यावेळी चारटर्न्स मध्ये त्यानी चार कॉइन्स काढली .पुढचा टर्न फेलजावून सुपेकरांकडे स्ट्रायकर गेला. यावेळी क्वीन अवघड जागी होती. सुपेकरनी सगळी कॉईन्स घेतल्यावर शेवटी क्वीन कव्हर अॅटटाईम घेवून अक्षरश: जादू केल्या सारखा गेम फिनिश केला. कांगणे सरनी उठून त्यांच्या पायाला हात कावून नमस्कार केला.
जानेवारी सेकंड वीकमध्ये आमचे अॅन्युअल लेसन लागले. शाळा तीच ..... गोखले स्कूलबोरिवली. मला बॅग पायपरची गोष्ट हे युनिट होतं. मी अगदी कसून तयारी केली. सगळं कसब पणाला लावून पाच सहा फ्लॅश कार्डस्, रोल अप बोर्डवर संकलनाचे प्रश्न. प्रस्तावने साठीदोन तीन प्रसंग चित्र अशी सगळी जम झाली. इंटर्नल एक्झामिनर माझा इन्सल्ट करणारे ‘ते’ सर होते. अर्थात त्या प्रसंगानंतर माझे नी त्यांचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध होते. खूप वेळा असेंब्ली झाल्यावर ते सर माझ्या रूम वर बसून सुपारी खात असत. एक्स्टर्नल एक्झामिनर त्याच शाळेतले पर्यवेक्षक हर्षे होते. पाठ चांगला झाला. सगळ्या स्टेप्स वेळेत पूर्ण झाल्या. लेसन संपल्यावर मी रिमार्क पाहिले. दोन्ही परीक्षकानी चांगले रिमार्क दिले होते. ते वाचूनमी गंगेत घोडं न्हालं म्हणून सुटकेचा सुस्कारा टाकला. पाच मिनिटानी शाळेचा शिपाई आला.“काळे,इंग्लीशचे टिचर कोण आहेत? त्याना सुपवायझर सरानी भेटायला बोलावलेल आहे. ”
मला काहीच उमगेना. त्यानी लेसन नोटवर तर चांगले रिमार्क लिहून..... मी साशंकित मनानेच त्यांच्या केबिनमध्ये गेलो. हर्षेसर चहा पीत होते. शिपायाला बोलावून माझ्यासाठी चहा आणायला सांगून मग ते बोलले. “तुम्हालाकुठच्या शाळेने लिव्हवर बी.एड्. साठी पाठवलंय का?” मी म्हणालो, “नाही. मी दहा महिने टेंपररी पोस्टवर गावाकडे, देवगड तालुक्यात जॉब केला. बाय चान्स मला कांदिवलीला अॅडमिशन मिळाली.” मग हसत हसत सर बोलले, “अच्छा, म्हणजे तुम्ही आताकुठेतरी जॉब शोधणार. मी या आधी तुमचे लेसन्स थोडेसे ऐकलेत. आजचा लेसन तर संपूर्ण ऑब्झर्व केला. आम्ही होतकरू शिक्षकांच्या शोधात असतो. दरवर्षी आमचे काही विद्यार्थी बोर्डाच्या मेरिट लिस्टमध्ये असतात. तुम्हाला आमच्या शाळेत नक्की जॉब मिळेल. क्लिअर व्हेकन्सीआहे.” त्यावर मी त्याना माझी अडचण सांगितली.
नोकरी मिळाली तरी रहाणार कुठे? तसंच पुढे मागे स्वत:ची जागा घ्यायची तर एवढी रक्कम कधी नी कशी काय उभी करणार? हर्षे सर म्हणाले, “अहो पर्मनण्ट झालात की बॅन्का पतपेढ्या लोन देतात. इथे राहिलेल्या सगळ्याच लोकानी असा हळू हळू जम बसवलेला आहे. कष्टाची तयारी असेल तर तुम्ही प्रायव्हेट क्लास मध्ये , नाईट स्कूललाकाम करून पगारा इतकी कमाई करू शकता. आमचा मुलगा बाहेर जॉबकरतो. इथे बोरीवलीत तीन रूमच्या घरात आम्ही दोघंच असतो. तुम्ही माझ्याकडे रहा. तुमची तयारी असेल तर बी. एड. करून जाण्याआधी मला भेटून जा. ”
बघता बघता असेंब्लीचा शेवटचा दिवस उजाडला. आज सहा वाजता ग्राउंडवर जायचं नव्हतं. आठ वाजता ध्वजवंदन झालं की रोजचा काच संपायचा होता. सगळेजण व्हाईट ड्रेसमध्ये ग्राउंडवर निघाले. आज ध्वज वंदनाला झाडून सगळे स्टाफमेंबर्स हजर होते. जी. एस्. मुच्छड थोरातने गार्ड ऑफ ऑनर दिला. प्रिन्सिपल सरानी ध्वजारोहण केल. ध्वज गीत झालं. मग सरानी सगळ्याना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या नी कार्यक्रम संपला.आम्ही धावतच खोली गाठली. माझ्या खोलीतल्या टेबलमधली शेवटची फुली खोडून झाली. सगळ्यानीकडाडून टाळ्या वाजवल्या. त्यादिवशी मोने आणि चित्रे या लास्ट असेंब्ली नंतर आमच्या ग्रूपला नाष्टा देणार होत्या. (क्रमश:)