बी. एड्. फिजीकल भाग 5
आम्ही टॅक्सी करून निघालो. वाटेत भेळवाल्यांच्या गाड्या दिसल्यातिथे थांबलो. प्रचंड भूक लागलेली होती. आम्ही रगडा पॅटिस खाल्लं. कुल्फी खाल्ली तेव्हाजरा पोटाला आधार लागला. आम्ही पाच जिने चढूनराजाच्या बिऱ्हाडी गेलो. चार पाच वेळा बेलमारल्यावर दार उघडलं. आठ बाय सहा फ़ूट बंदिस्त व्हरांड्यात सोफा नी नी स्टुल ठेवलेलंहोतं. आम्ही सोफ्यावर बसलो. शर्ट काढून आत जाता जाता राजा त्याच्या बायकोला म्हणाला, “याना पाण्याचा तांब्या भांडं आणून दे. तिने दोन मिनिटात तांब्या भांड आणूनस्टुलावर ठेवलं नी धाड्कन दार लावून आतून कडीघालून घेतली.
राजा आमची झोपायची काहीतरी सोय लावील म्हणूनआम्ही तासभर वाट बघितली. पण राजा आत गेला तो गेला. मी भिडस्त.... त्यात राजा कोण काय मला काहीही माहिती नव्हती. आम्ही पाय दुमडून आलकट पालकट मारीत गप्प बसून राहिलो होतो. वेळजाता जात नव्हता. खूप वेळ गेल्यावर निळूभाउ म्हणाले,“ह्या राजाने कोकणस्थी कावा दाखवला......माझ्या पदरचा रगडा पॅटिस खावून नी टॅक्सी बील माझ्या गळात मारून आपली सोय लावून घेतलीन.......” मी काहीच बोललो नाही. फक्त अधून मधून वाजले किती विचारीत होतो. साडे पाच वाजले तेंव्हा लघवीची कळ यायला लागली . निळू भाऊनी बाहेरचा दरवाजा उघडायची खटपट करून पाहिली पण दाराचे लॅच उघडेना. लॅच त्यावेळी नुकतेच वापरातआलेले नव्हते. मी तर खेडे गावातून गेलेला मला हा प्रकारच नवीन होता. पंधरा मिनीट6 गेलीनी माझा नेट संपला. मी निळूभाऊना म्हटलं,“आता राजाला हाका मारून दार उघडायला सांगा नाहीतर मला सोफ्याच्या मागे धार मारावी लागेल. हाका मारून काही उपयोग़ नव्हता. पाच सहा मिनिटं दार वाजवलं. मग़ मी सरळ पाणी प्यायचं भांड घेवून भांड्याला पोचे येई पर्यंत दार बडवल्यावर राजाचीमुलगी डोळे चोळीत चोळीत आली. आम्ही तिला लॅच उघडून द्यायला सांगितल. लॅचच्या खालच्या बाजूला लिव्हर होती. ती बाजुला ओढल्यावर दार उघडलं नी आम्ही तुरुंगातून बाहेर पडलो. पावणे सहा वाजून गेलेले होते. पाऊण तास रपेट मारल्यावर आम्ही माटुंगा रेल्वे स्टेशनवर पोहोचलो. मी गोरेगावलान जाता परस्पर कांदिवलीला गेलो.
लगतच्या शनिवारी मी गोरेगावला निळूभाऊंकडे गेलू तेंव्हा वहिनीना मी राजा काकानी दिलेला दणका सविस्तर सांगितला. खरंतर त्यापूर्वी खूप वेळा राजाकाका कुटूंब कबिल्यासह निळू भाऊंकडे पुख्खा झोडून गेलेले होते.महिन्यातून एकदा तरी अंधेरीला सासरवाडीला येता जाता हक्काने निळू भाऊंकडे येवून जेवून जायचा त्यांचाप्रघात होता. पण त्या घटनेनंतर मात्र मी असेतो त्या वर्षभरात मात्र ते एकदाही फिरकले नव्हते. निळू भाऊंची बैठ्या चाळीत १८X१०चीखोली होती.बाहेरच्या बाजुला ८X१० व्हरांडा होता. चाळीतल्या चार बिऱ्हाडांमध्ये टोकाची रूम त्याना मिळाल्याने त्यानी आपल्या एरिया पुरती भिंत घालून तनखा तोडून घेतलेला होता. तिथे कायम दोन कॅरम बोर्ड मांडलेले असत नी वाडीतले आठ दहा कॅरम प्रेमी सकाळी ८ ते रात्री मध्यरात्र उलटेपर्यंत आळी पाळीने टिकल्या मारीत बसलेले असत. कडेच्या दोन बाकवजा सोफ्यांवर त्यांचे तीन मुलग़े विनय, विनेक, विजय नी मी बसत असू.
गेम मारल्यावर माफक आरड ओरडा होत असे. पण एरव्ही फक्त स्ट्रायकरचाआवाज येई.खेळकरी शांत बसून खेळत. निळूभाऊना खेळायचं असलं की दोन सेटवरती जास्त वेळ थांबलेला भिडू त्याना आपली जागा खाली करून देत असे. मी गेलो त्यादिवशी रात्री जेवण उरकून निळूभाऊ खेळायला बसल्यावर सुपेकर सुपरिटेण्डण्ट आले. ते आल्या आल्या “ये पाप्या इथे बस... ” म्हणत निळू भाऊनी त्याना आपली सीट बहाल केली.कॉलनीतले सगळेच लोक त्याना पाप्या म्हणत. दोन भिडू खेळल्यावर सुपेकरांचा टर्न आला. त्यानी बोर्डवर भरपूर पावडर टाकून घेतली. तर्जनी आणि आंग़ठा यात स्ट्रायकर पकडून बोर्डचं निरीक्षण केलं नी स्ट्रायकर ठेवून त्याच्या सेंटरवर मधलं बोट ठेवून पुश दिला. स्ट्रायकर सणसणत गेला नी एक कॉईन मागच्यादिशेने उजव्या पॉकेटमध्ये पडलं. पुढे जावून स्ट्रायकर बोर्डाच्या साईडवर खाट्कन हिट करून समोरच्या डाव्या पॉकेट मध्ये थंब घेतात त्या ठिकाणीवहोती तीला पुश करून दाव्या लाईनवरची कॉईन डाव्या पॉकेटमध्ये घालवून सुपेकरांच्या समोरयेवून थांबला. एका हिट मध्ये तीन कॉईन मिळाली होती. आता बोर्डवर चार कॉईन आणि क्वीनहोती. पुढच्या हिटला क्व्वीन आणि कव्हर दोन्ही घेतलं. तिसऱ्या टर्नला एक कॉईन घेवून दुसरं कॉईन डाव्या थंबकडे आलं. त्यानी ते थंबने न घेता रिबॉण्ड मारून घेतलं नी गेम संपला.
पुढच्या राऊण्डला पहिला टर्न साहजिकच सुपेकरानाच मिळाला. पहिल्या वेळी सेट फोडताना तीन एका वेळी तीन कॉईन घेतली नी पुढच्या तीन खेळ्यांमध्ये गेम फिनिश केला. मी मंत्र मुग्ध होवीन त्यांचा गेम बघितच राहिलो. दाव्या उज व्या दोन्ही हातांच्या कोणत्याही बोटाने ते स्ट्रायकर मारू शकत असत.समोरची सोंगटी हिट करून ती त्याच रेषेतल्या पॉकेटमध्ये न घालता उरलेल्या तीन पैकी कोणत्याही पॉकेटला गेऊ शकत. किंबहुना बोर्डवर कुठेही असलेली कॉईन चारापैकी कोणत्याही साईडवर बसूनतुम्ही सांगाल त्या पॉकेटला घेवून दाखवीत, एकदा बोर्ड त्यांच्या हातात आला की स्टार्ट टू फिनीश त्यांच्याच हातात रहायचा.सलग दोनदा बोर्ड घेतल्यावर ते खिलाडू वृत्तीने आपला टर्न हॅण्डोव्हर करीत. पुढच्या दीड दोन तासातमी भारल्यासारखा त्यांचा गेम बघित होतो. त्यांच्या कॉईनच्या मार्गात प्रतिस्पर्ध्याची कॉईन आली तर ते स्ट्रायकर असा काय हिट करीत की अडथळा करणारे कॉईन उसळून बोर्डाच्या बाहेर आणि त्यांचं कॉईन पॉकेट मध्ये पडायचं.
मेस साठी लागणारा जिन्नस, भाजी त्या महिन्याची पर्चेसिंगकमिटी असेल त्यातले लोक आणित. जेण्टस् च्या मेस सोबत लेडिज मेसचा जिन्नसही आणला जातअसे. सामान आलं की यादीप्रमाणे ते चेक करून वजन करून घेणं. लेदिज मेसचं सामान त्यांच्या यादीप्रमाणे वेगळं करून देणं ही कामंही प्राचार्यानी अलिकडेच फडणीसवर सोपवलेली असायची. त्यादिवशी असेंब्ली सुटल्यावरअसंच सामान आलं. आमच्या कुलाच्या रूम मेससमोर होत्या. फडणीसने व्हरांड्यात मांडवे,जाधव दिसले याना मदतीला हाक मारली. ते बाहेर फिरायला नेघालेले त्यानी सरळ उडवून लावलं.“आमी फिरायला जातूया. आनी मदीच ह्ये लष्कराच्या भाकरी बडवाय आमीच बरं घावलो की तुला”हेउत्तर ऐकून तात्या वैतागला.“आरे मर्दा, फिरायला मलापण जायचं आहे की.... जरा मदत टाकलीततर मी पण लौकर मोकळा होईन , हे काय माझ्या घरच काम आहेका?”त्यावर “तुला झेपत आशेल तर कर न्हाईतर बस बोंबलत....”
मी आणि चावरेकर रूमबाहेर पडतच होतो. आम्ही सगळं ऐकलं होतं.चावरेकर बोलला, “काय मानसं हायती.... ह्येंच्या पेक्षा ते बैलं बरंकी. गाडीवानानं सोगा उचलला की बापडं आपन हून फुडं व्हवून जोखाड मानेवं घेत्यात.” सामान मोजताना तांदूळ,डाळ, साखर, कडधान्यं प्रत्येक जिन्नसात१५/२० किलो तूट यायला लागली.“अरे, मर्दानो, दुकानदार मापतो तेंव्हा जरा नीटबगत जावाकी.... ” त्यावर पर्चेसिंगला गेलेले बागुल नी खराडे म्हणाले, “आमी आज पैल्यांदाच गेलू की. आता दुकानदार आसं फशिवतो आमास्नी काय दख्खल?”खरी गोम वेगळी होती. याआधी दोनवेळा मेसमधला नोकर दत्तू हे काम करी. पण यात गडबड झाले म्हणून त्याने प्राचार्यांना सांगून अंग काढून घेतलं होतं. फडणीस हर एक जिन्नस काटेकोरपणे मोजून घेईल याची त्याना कल्पना नव्हती. म्हणून त्यानी योजून घपला केला होता. ते सारवा सारवी करीत म्हणाले,“आतायेक पावट् जाऊदे की गड्या. ल्येडिज म्येस नी जेण्टस् दोगावर विभागून टाक की.... ह्येकोना येकाच्या घरचं काम थोडच हाय..... आमी काय मुद्दाम केल्यालं न्हाय..... तुज्याच हातात हाय ... टाक की मिटवून काय आनी वाळली कचकच करतुयास.....” (क्रमश: )