#श्रावण
#नारळीपोर्णिमा
🌟नारळी भात
या दिवशी नारळीभात करणे
एक अलिखित नियम असतो 😊
घरोघर ज्या त्या पद्धतीने केला जातो
🌟साहित्य
एक वाटी तांदूळ
अर्धी वाटी खोबरे
पाऊण वाटी गुळ
थोडे बेदाणे, काजू
लवंग ,वेलदोडा
🌟कृती
प्रथम पातेल्यात तूप घालून काजू बेदाणे परतून बाजूला काढले
लवंग, वेलदोडा तुपाच्या फोडणीत घालून तांदुळ धुवून त्यात परतले
ओले खोबरे त्यातच परतून घेतले
तळलेले बेदाणे काजू घालून
एक वाटी तांदळाला दोन वाट्या पाणी घालून शिजवून घेतला
झाकण ठेवून वाफ येऊ दिली
नंतर गुळ घालून गुळ विरघळे पर्यंत पुन्हा परतले
परत झाकण ठेवून वाफ आणली
नारळीभात तयार आहे
मुद पाडून घेतली
🌟सजावटी साठी सोबत घरच्या सोनचाफ्याची सुवासिक फुले