Marathi Quote in Book-Review by Mandar Milind Kulkarni

Book-Review quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

Book Review: काळे-करडे स्ट्रोक्स
______________________________
प्रणव सखदेव लिखित " काळे-करडे स्ट्रोक्स " ही एक आजच्या काळातील कादंबरी आहे. तरूण-वर्गात वापरली जाणारी इंग्रजीयुक्त भाषा हे तिचे वैशिष्ट्य. अगदी मोकळेपणाने ही कादंबरी आपल्याशी बोलते. सर्वसामान्य लेखनाच्या चौकटी मोडून काढत ती पुढे जाते. तरूण वर्गातील काही प्रातिनिधिक पात्रांभोवती ही कथा फिरते. ही कादंबरी आपल्याला खिळवून ठेवते, अस्वस्थ करते आणि पार घुसळून काढते. मुंबईतील रुईया कॉलेज आणि त्याचा सभोवताल हा ह्याचा महत्वाचा घटक आहे.

लेखकाचा आणि कथेच्या नायकाचा हारुकि मुराकामी हा आवडता लेखक आहे, त्यामुळेच या कादंबरीवर त्यांच्या 'नॉर्वेजिअन वूड्स' या पुस्तकाची छाप आहे. तरीही लेखकाने आपली वेगळी शैली आणि भाषा यांचा खुबीने वापर केला आहे.

या कथेत अनेक वळणं येतात, काही अपेक्षित तर काही मुळापासून हादरवून टाकणारे. घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा कथेवर तसेच कथेचा नायक समीर याच्यावर खूप मोठा परिणाम होतो आणि तो आणखीनच गुरफटत जातो. उदासीनतेची एक वेगळीच छटा त्याच्या आयुष्यावर पसरते. ही कादंबरी वाचताना आपणही अंतर्मुख होऊन जातो. खरंच आपण जेवढं म्हणतो तेवढं आयुष्य सरळ-सोपं असते का? खरंच आयुष्य जितकं आनंदी रंगांमध्ये रंगवले जाते ते सत्य असते की निव्वळ भास ? असे नानाविध प्रश्न आपल्याला भंडावून सोडतात. इथे एक नेहमीपेक्षा पूर्णपणे भिन्न असा दृष्टीकोन अनुभवायला मिळतो. निराशा, उदासीनता, एकटेपणा अश्या विभिन्न भावनांचे हे मिश्रण चांगले जमून आले आहे. मराठी भाषेत पहिल्यांदा असे काही घडते आहे. जर असा वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर नक्की हे पुस्तक वाचावं.

Marathi Book-Review by Mandar Milind Kulkarni : 112032333
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now