🌨️पावसाळी हवा खाउया काहीतरी गरम खमंग .
.तोंडाला चव आणेल असे 🌨️
...🟡.." डाळीचे खमंग वडे.."🟡
..
🟡साहित्य :
एक वाटी हरभऱ्याची डाळ
अर्धी वाटी डाळी चे पीठ ,
कांदा,हिरवी मिरची, हळद
कढीलिंब,कोथिंबीर,
लाल मिरची तीन चार
थोडी बडीशेप
तेल,
चवीनुसार मीठ...
.
🟡कृती :-हरभऱ्याची डाळ चांगली स्वच्छ धुऊन घ्या व चार तास भिजवून ठेवा .
नंतर एखाद्या चाळणीमध्ये डाळ काढून सर्व पाणी काढून टाका .
यातील थोडी डाळ वेगळी काढून ठेवा
आता डाळ मिक्सर मध्ये थोडी जाडसर वाटा.
🟡आता एका पातेल्यात वाटलेले मिश्रण घ्या , त्यात डाळीचे पीठ , कांदा , लाल मिर्चीचे तुकडे, हळद , कढीलिंब , कोथिंबीर आणि मीठ बडीशेप टाकून मिश्रण चांगले एकजीव करा .
यातच वेगळी काढून ठेवलेली अख्खी डाळ मिसळा
🟡कढईत तेल गरम करायला ठेवा . दरम्यान तयार मिश्रणाचे लहान भाग घेऊन हातांच्या मदतीने मध्यभागी जरा दाब देऊन गोल आकार द्या .
तेल चांगले गरम झाले की तयार वडा अलगद तेलात सोडा .
वड्याचा रंग सोनेरी , चुरकुरीत झालाकी त्याला पालटून दुसरी बाजू सुद्धा तळून घ्या .
अश्याच पद्धतीने सर्व वडे तळून तयार करा
🟡आवडीच्या चटणी अथवा सॉस सोबत खायला घ्या