🌞उपवास स्पेशल
🌞वरईची (वरी) खीर
🌞साहित्य
अर्धी वाटी वरई
अर्धा लिटर दुध
एक चमचा तूप
काजूआठ दहा
वेलदोडे पुड
साखर अर्धी ते पाऊण वाटी
🌞कृती
प्रथम वरई धुवून भिजत ठेवावी
तासभर भिजल्यावर
एका सुक्या कपड्यावर पसरवून कोरडी करावी
काजूची मिक्सर जाडसर भरड करून घ्यावी
वरई पूर्ण कोरडी झाली की
पॅन मध्ये तूप घालून भाजायला घ्यावी
एकीकडे दूध गरम करायला ठेवावे
वरई मंद आचेवर खरपूस भाजली की
त्यात काजू पावडर टाकून परतावे
त्यानंतर एक वाटीभर पाणी घालून झाकण ठेवावे व वरई शिजवून घ्यावी
(कुकरला शिट्टी करून सुद्धा शिजवता येईल)
नंतर झाकण काढून त्यावर त्यावर गरम दूध घालून आवडीनुसार साखर घालावी
खीर चांगली उकळू द्यावी
गॅस बंद करुन वेलदोडे पावडर घालावी
काजू पावडर घातल्याने खीर घट्ट होते व चांगला स्वाद येतो
आवडीनुसार दूध वाढवून खीरीचा दाटपणा कमीजास्त करता येतो