Marathi Quote in Poem by Vaishnavi Kale

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

थांब जरा...

लाटांना आसवांच्या
चांदवा तुझ्या नजरेतला
स्पर्शू दे जरा...
विरहाच्या सरींना
हास्याच्या तुषारांनी
भिजवू दे जरा...

थांब जरा...

पोळलेल्या या कायेला
गारवा तुझ्या सावलीचा
जाणवू दे जरा...
हृदयांत दडलेल्या
शब्दांच्या राशी
ओठांवर येऊ दे जरा...

थांब जरा...

प्रश्नांनी श्रमलेल्या मनाला
विश्वासाच्या कवेत तुझ्या
निजवू दे जरा...
आतुर दृष्टीला माझ्या
स्वप्नांचा उंबरा
ओलांडू दे जरा...

थांब जरा...

एकल्या रात्रीनंतर घराला
चैतन्याची पहाट माझ्या
पाहू दे जरा...
पानी हृदयाच्या हा चेहरा
नेत्रांच्या कुंचल्याने
रंगवू दे जरा...

थांब जरा...

काळजीची ही शिदोरी बांधताना
प्रेमाचा घास तुला
भरवू दे जरा...
सोडवून घेताना हातांना
अंतर हृदयांतले आपुल्या
संपवू दे जरा...

थांब जरा...

पावलांना माझ्या
तुझ्या ठशांवर चालताना
थांबवू दे जरा...
अन् पाहताना तुला पाठमोरे
गाठताना तुझ्या क्षितीजांना
या क्षणभर विसाव्याच्या
आठवणींची,
माळ गुंफु दे जरा...

थांब जरा...


                                                                               - वैष्णवी....

Marathi Poem by Vaishnavi Kale : 112025958
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now