#गुळपापडी
♦️द्वी धान्य गुळ पापडी
पौष्टिक, चविष्ट आणि अगदी सोपी, कमी वेळात तयार होणारी 😊
♦️साहित्य
राजगिरा पीठ एक वाटी
नाचणी पीठ एक वाटी
एक वाटी गुळ
वेलदोडे पूड एक चमचा
दोन चमचे तूप
♦️ कृती
प्रथमकढई मध्ये तुपात दोन्हीं पीठे खमंग वास येईपर्यंत भाजुन घ्यावी
पीठे खाली काढून कढईत थोडे तूप व एक वाटी गूळ घालावा
♦️गुळ वितळला की ताबडतोब कढई खाली उतरवावी व दोन्ही पीठे मिसळून वेलदोडे पावडर घालावी
एकसारखे करून गोळा करून घ्यावा
तूप लावलेल्या थाळीत पसरून घ्यावे
वरून कोरडे किसलेले खोबरे थापून घ्यावे
♦️गार झाल्यावर आवडीच्या आकारात वड्या कापाव्यात