लपंडाव
येते डोळ्यांत अश्रूंची धाव,
जेव्हा आठवतो तुझा माझा लपंडाव…
होतं एक सुंदरस गाव,
स्वप्ननगरी त्याचं नाव,
पाहिलं तिथं खेळताना तिला लपंडाव,
जेव्हा गेली तीची माझ्याकडे नजरेची धाव,
हरवून बसलो मी माझ्या हृदयाच्या ठाव,
दिसलं तीच्या चेहऱ्यावर आपलासा हावभाव,
वाटलं मला हिच्यासोबत खेळावा प्रेमाचा लपंडाव…
जेव्हा विचारलं मी तिला,
आवडेल का ग हा स्वप्ननगरीची राणी व्हायला,
म्हणाली आवडेल मलाही
तुझ्यासोबत हसायला,
स्वप्ननगरीत दूर दूर बागडायला,
पण असं केल्याने आवडेल का हे दुनियेला,
आवडेल का हे माझ्या मित्र आणि सहपरिवाराला…
आली अलबत्त डोळ्यांतून अश्रूंची धाव,
जेव्हा झाला हृदयाला छोटासा घाव,
विरक्तून गेलं स्वप्नातील गाव,
म्हणाली नाही आवडणार तुझ्या
नावासोबत जोडायला माझं नाव,
पण जेव्हा जेव्हा आठवतो तुझा माझा लपंडाव,
येते डोळ्यांत अश्रूंची धाव,
जेव्हा आठवतो तुझा माझा लपंडाव…
जेव्हा आठवतो तुझा माझा लपंडाव…
✍️ आदर्श पाटोळे