....वळण......
दोन अलग अलग वाटावरुन चालताना..
..एका" अनोख्या" वळणावर आपली भेट झाली...
एकमेका सोबत गप्पा..गोष्टी करत...
सहवासाचा आनंद घेत दोघेही.. चालु लागलो...
चालता चालता ..कधी हात एकत्र गुंफले गेले कळलेच नाही..
आणी ..मग दोघे मिळुन...
मैत्रिची वाट चालु लागलो.....
..अचानक समोर एक अनपेक्षीत...वळण आले..
भोवताली खुप सारा...मंद ..धुंद ..सुगंध,,पसरला होता..
अवती भवती...सुरेख ..फुले पसरली होती....
वातावरण अचानकच..खुप मोहक वाटत होते..
मी अगदी बावरुन गेले..!!!
आणी तुझा हात ..घट्ट पकडला....
तुही त्याच वेळी माझ्याकडे पाहिलेस..
आणी मला समजले...
तु तर मला प्रेमाच्या..वाटेवर घेवुन आला होतास..!!!!
वृषाली **❤