🌿मेथी पराठा
🌿मेथी पराठा खुप वेळा केला जातो
कधी मेथीची भाजी मधे घालून
कधी कच्ची मेथी घालुन
कधीं मेथी पेस्ट वापरून...
हा एक थोडा वेगळ्या प्रकारचा ट्विस्ट असलेला पराठा आहे 😊
🌿साहित्य
बारीक चिरलेली अर्धी मेथीची जुडी
अर्धी वाटी कणीक
अर्धी वाटी डाळीचे पीठ
हळद एक छोटा चमचा
ओवा एक चमचा
मीठ चवीनुसार
🌶️ चिली फ्लेक्स पाव वाटी
थोडे मिक्स हर्ब्ज
ओवा पाव चमचा
किसलेले चीज (तयार मिळते)
🌿कृती
प्रथम बारीक चिरलेली मेथी मीठ हळद ओवा कणीक आणि डाळीचे पीठ एकत्र करून भिजवून घ्यावे
पंधरा ते वीस मिनीटे पीठ मुरू द्यावे
🌿यानंतर पीठाचे दोन गोळे घेउन लाटून घ्यावे
दोन गोळ्यामध्ये किसलेले चीज भरावे
व्यवस्थित दाबून बंद करून घ्यावे
हलक्या हाताने पराठा लाटावा
🌿लाटून झाल्यावर त्यावर 🌶️ चिली फ्लेक्स आणि मिक्स हर्ब पसरून परत थोडे लाटावे
तेलावर दोन्हीकडून खरपुस भाजुन घ्यावा
🌿पराठा तयार झाल्यावर खाताना आत वितळलेल्या चीजची चव अफलातून लागते...😋
🌿फ्लेक्स वापरणार असाल तर पारींत तिखट घालू नये
फ्लेक्स नसतील तर पीठ भिजवताना एक चमचा तिखट घालावे