#स्वयंपाक_रोजचाच
🥕गाजराची भाजी
🥕 साहित्य
पाव किलो गाजर
फोडणीचे साहित्य
तिखट मीठ हळद
एक मोठा चमचा डाळीचे पीठ
मीठ चवीनुसार
🥕कृती
गाजर चिरुन मध्यम जाडीच्या फोडी कराव्या
मोहरी हिंग फोडणीत या फोडी टाकून
झाकण ठेवून वाफवून घ्यावे
🥕अर्धी वाटी पाणी घालून परत झाकण ठेवून थोडा वेळ शिजवावे
गरज लागल्यास परत अर्धी वाटी पाणी घालावे
🥕भाजी शिजली की तिखट हळद मीठ घालून परतावी
व एक मोठा डाळीचे पीठ कोरडेच वरती पेरून परत एकत्र करून हे कोरडे घातलेले डाळीचे पीठ शिजण्या साठी फक्त दोन मिनिटे झाकण ठेवून गॅस बंद करावा
एक वाफ आणावी
🥕साधी सोपी पटकन होणारी भाजी तयार...
वरती थोडी कोंथिबीर पेरावी