बाप कळला मला बाप झाल्यावर
उचलून घेता खांद्यावर
हसू तुझ्या ओठावर
माझा जीव सारा तुझ्यावर
बाप कळला मला बाप झाल्यावर
बाप माझ्यासाठी तुटतुट तुटला असंल
माझ्या सुखासाठी राबराब राबला असंल
कधी एकटयातंच रडला असंल
माझ्या गरजांसाठी स्वत:चं मन त्यानं मारलं असंल
बाप समजला नाही मला वेळेवर
बाप कळला मला बाप झाल्यावर
सुखाची छाया राहावी सदैव तुझ्यावर
संकटाला घाबरु नकोस झेलीन तुझ्यावरचे सारे वार
कळलं मला लेकराचं ओझं नसतं बापावर
बाप कळला मला बाप झाल्यावर
कवी- संदीप खुरुद